पुण्यातील भयानक घटना,ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट
आय मिरर
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळील एका इमारतीबाहेरील ट्रान्सफॉर्मरचा शनिवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास भीषण स्फोट झाला. सुदैवाने, अग्निशामक दलाने वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक ट्रान्सफॉर्मरमध्ये मोठा तांत्रिक बिघाड होऊन स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, आगीचे लोळ जवळच असलेल्या एका इमारतीच्या पार्किंगपर्यंत पोहोचले. ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. वेळीच आग विझवल्याने ती इमारतीच्या वरच्या मजल्यांपर्यंत पसरली नाही. तरी सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. परिसरातील वीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ खंडित करण्यात आला होता.
परिसरातील वीजपुरवठा काही काळ झाला खंडित
वीजपुरवठा खंडित खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित करण्यात आला होता.या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसली तरी,ट्रान्सफॉर्मरचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू असणार आहे.
What's Your Reaction?