बिग ब्रेकिंग | दिल्लीत स्फोटाने लाल किल्ला हादरला ! बेवारस कार मध्ये स्फोट, आठ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

Nov 10, 2025 - 20:27
Nov 10, 2025 - 20:33
 0  967
बिग ब्रेकिंग | दिल्लीत स्फोटाने लाल किल्ला हादरला ! बेवारस कार मध्ये स्फोट, आठ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

आय मिरर 

राजधानी दिल्लीत बेवारस कार मध्ये आज सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून 24 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटामुळे दिल्लीचा परिसर हादरून गेला आहे. दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशनच्या जवळ हा स्फोट झाला आहे. नेमकं या स्फोटामागील कारण काय असू शकतं हे आता दिल्ली पोलिसांकडून शोधलं जातय. 

दिल्ली स्फोटानंतर मुंबईमध्ये सुरक्षा वाढवण्यात आले आहे. मुंबई सह उत्तराखंड राजस्थान मध्ये देखील हाय आर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण देश या स्फोटानंतर अलर्ट मोडवर गेला आहे.दिल्ली स्फोटानंतर मुंबई आणि उत्तर प्रदेश मध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. राजस्थानमध्ये देखील हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव अलर्ट देण्यात आला आहे. देशाच्या विविध सीमा भागात देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

आज सायंकाळी सहा वाजून 55 मिनिटांनी मेट्रो स्टेशन परिसरात हा स्पोर्ट झाला त्यानंतर लोकांची एकच धावपळ सुरू झाली. हा स्फोट एवढा भीषण होता की आगीचे लोट बाहेर पडले. काही समजण्याच्या आतच हा भीषण स्फोट झाल्याने अनेकांची धावाधाव झाली. या संपूर्ण घटनेनंतर आता पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. 

पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकाराची आता चौकशी केली जात आहे. ज्या परिसराचा स्पोर्ट घडला त्या ठिकाणचा परिसर पोलिसांनी सिल केला आहे. मेट्रो स्टेशन संपूर्ण बंद करण्यात आले असून या परिसरात पोलिसांचा चौक बंदोबस्त ठेवण्यात आलाय.लाल किल्ला परिसर हा वरदळीचा परिसर असतो,या भागात प्रवासी चालले होते अचानक स्फोट झाला त्यामुळे यात अनेक जण जखमी झाले. रस्त्यावरती रक्ताचे सडे पडले काचांचा खच पडला.

 

लाल किल्ला परिसरातून पाचशे मीटर अंतरावर हा स्फोट घडला. यात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू तर 24 जण जखमी झाल्याची माहिती यातील जखमींवर एलएनजीपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झाल्यात आणि या संपूर्ण घटनेचा दिल्ली पोलिसांकडून कसून तपास केला जातोय.या घटनास्थळाच्या परिसरात सध्या कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

अमित शहांचा दिल्ली पोलीस आयुक्तांना फोन...

या संपूर्ण घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पोलीस आयुक्तांना फोनवरून संपर्क साधत या घटनेची माहिती घेतली आहे.आय बी प्रमुख एन आय आणि पोलीस आयुक्तांना अमित शहा यांनी फोनवरून संपर्क साधत या संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे. हा ब्लास्ट नेमका कसा झाला आहे, हा ब्लास्ट सीएनजीचा झाला आहे असं सांगण्यात येत आहे मात्र एवढा मोठा ब्लास्ट सीएनजीचा असू शकतो का ? की यामध्ये वेगळं कारण आहे याची माहिती अमित शहा यांनी आता दिल्ली पोलिसांकडून मागवली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow