जबरी चोरी अन् खुनाच्या प्रयत्नात होते फरार वडगाव निंबाळकर पोलिसांनी वेश बदलून घातलं जेलात
आय मिरर
जबरी चोरी आणि खुनाच्या प्रयत्नातील दोन फरार आरोपींना वडगाव निंबाळकर पोलिसांनी वडगाव निंबाळकर पोलिसांनी वेशांतर करून थेट गजाआड केलं आहे.या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे.
पवन सॅंडल काळे आणि रवींद्र तात्याबा खामगळ अशी संशयित आरोपींची नावे असून यातील एक आरोपी हा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आहे तर दुसरा बारामती तालुक्यातील खामगळवाडी मधील असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी दिली आहे.
फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वडगाव निंबाळकर पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तपास कौशल्याची आणि तत्परतेची चुणूक दाखवून दिली आहे.
जबरी चोरीतील फरार आरोपीला वेशांतर करून ताब्यात...
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 154/2026, भारतीय न्याय संहिता कलम 309(6) अन्वये दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पवन सॅंडल काळे, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. सदर आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, वडगाव निंबाळकर पोलिसांनी विशेष रणनीती आखत वेशभूषा बदलून त्याचा शोध घेतला आणि अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी ही जेरबंद !
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 77/2026, भारतीय न्याय संहिता कलम 109, 118(2) अन्वये दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी रवींद्र तात्याबा खामगळ, रा. खामगळवाडी, ता. बारामती, जि. पुणे याचाही पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
प्रभारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची उल्लेखनीय कामगिरी !
ही रवाई वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत पोलीस हवालदार हृदयनाथ देवकर, पोलीस हवालदार अनिल खेडकर, पोलीस हवालदार संदीप गायकवाड, पोलीस शिपाई विकास येटाळे, सचिन घाडगे, आबा जाधव, नरेंद्र यादव, सूरज धोत्रे, नागनाथ परगे तसेच चालक होमगार्ड संदीप कसबे यांनी सहभाग घेतला.
What's Your Reaction?