बारामती गोळीबार प्रकरण ! गुन्ह्यात वापरलेले दोन पिस्टल पोलिसांकडून जप्त,बंड्याच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके

Nov 22, 2026 - 15:32
Nov 22, 2026 - 15:35
 0  672
बारामती गोळीबार प्रकरण ! गुन्ह्यात वापरलेले दोन पिस्टल पोलिसांकडून जप्त,बंड्याच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके

आय मिरर 

बारामतीतील बांधकाम व्यवसायिक राजन धनंजय कोळेकर यांनी दोन लाख रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्याच्या कारणातून त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वाहनावर काल शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात बारामती तालुका पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं केवळ आठ तासाच्या गुन्ह्यात वापरलेले दोन पिस्टल जप्त केले असून दोन संशयित अल्पवयीन बालकांना देखील ताब्यात घेतलं आहे. 

या दोन्ही अल्पवयीन बालकांनी सदरचा गुन्हा अक्षय उर्फ बंड्या काळे याचे बरोबर जाऊन केला असून अक्षय उर्फ बंड्या काळे हा 2015 ते 2019 या काळात राजन कोळेकर यांच्याकडे काम करत होता अशी माहिती ही पुढे आली आहे.त्याच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके रवाना करण्यात आली आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी दिली आहे.

गोळीबाराची घटना घडल्यानंतर बारामतीत मोठी खळबळ उडाली होती, तपासा दरम्यान पोलिसांनी दोन विधी संघर्ष ग्रस्त बालकांना ताब्यात घेतलं, गुन्ह्याची कबुली दिली.त्यांच्याकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेले दोन पिस्टल देखील पोलिसांनी जप्त केले आहेत.

सदरचा गुन्हा अक्षय उर्फ बंड्या काळे याचे बरोबर जाऊन केला असल्याचं पोलीस तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी अक्षय उर्फ बंड्या काळे याच्या शोधासाठी पोलीस पोलीस पथके रवाना केली आहेत. गुन्हाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार करीत आहेत.

बीके कंपनी या इंस्टाग्राम अकाउंट वरून अक्षय उर्फ बंड्या काळे आणि त्याचे दोन अल्पवयीन साथीदार यांनी राजन कोळेकर यांना दोन लाख रुपयांची खंडणी मागितली होती ती देण्यास कोळेकर यांनी नकार दिला.त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास कोळेकर यांच्या घराच्या पार्किंग मध्ये लावलेल्या चार चाकी वाहनावर हल्लेखोरांनी दोन राऊंड फायर केले ते पसार अशी तक्रार बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या पथकाने केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow