७ दिवसाच्या बाळाला 'ट्रेकियोसोफेजियल फिस्टुला' डॉ.रविराज शिंदे यांच्या टीमचे जिवापाड प्रयत्न अन् सर्वांनीच टाकला सुटकेचा श्वास 

Feb 24, 2026 - 08:17
Feb 24, 2026 - 08:20
 0  1093
७ दिवसाच्या बाळाला 'ट्रेकियोसोफेजियल फिस्टुला' डॉ.रविराज शिंदे यांच्या टीमचे जिवापाड प्रयत्न अन् सर्वांनीच टाकला सुटकेचा श्वास 

आय मिरर

अवघ्या ७ दिवसांच बाळ आणि वजन फक्त १.८ किलो अशातच जन्मताच ट्रेकियोसोफेजियल फिस्टुला (TEF) या अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराची लागण. सतत होणाऱ्या उलट्यांच्या त्रासामुळे विविध रुग्णालयात बाळाची आई आणि बाबा उपचारासाठी धावपळ करतात.अशात इंदापूर मधील डॉ.रविराज शिंदे यांच्या अनुश्री चिल्ड्रन्स अँड मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात हे बाळ उपचारासाठी दाखल होतं, डॉक्टरला आजाराचे योग्य निधन होतं बाळा वरती उपचार केले जातात आणि बाळाचा जीव वाचतो. सर्वच जन सुटकेचा श्वास टाकतात.

ही घटना आहे पुण्याच्या इंदापूर मधील एका अवघ्या सात दिवसाच्या जन्मलेल्या बाळाच्या बाबतीत घडलेली. ज्या बाळाचं सात दिवसातील वजन केवळ एक पूर्णांक आठ किलो होतं. अशात या बाळाला ट्रेकियोसोफेजियल फिस्टुला (TEF) या अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराची लागण झाली. बाळाला उलट्यांचा त्रास सुरू झाला उपचारासाठी आई-वडिलांनी काही तज्ञांकडे ही बाळाला दाखवलं मात्र बाळाची प्रकृती नाजूक बनत चालली होती. 

इंदापूर मधील डॉक्टर रविराज शिंदे यांच्या अनुश्री चिल्ड्रन्स अँड मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात या बाळाला उपचारासाठी दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी बाळाची बारकाईने तपासणी केली आणि अखेर या बाळाला ट्रेकियोसोफेजियल फिस्टुला (TEF) या अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराची लागण झाल्याचं निदान स्पष्ट झालं. नंतर बाळा वरती उपचार करण्यात आले आणि बाळाची प्रकृती सुधारली आणि त्याचे प्राण देखील वाचले.

ही यशोगाथा ग्रामीण भागातही योग्य सुविधा, तज्ञ डॉक्टर आणि समर्पित टीमवर्कच्या बळावर अशक्यप्राय वाटणाऱ्या आजारांवर मात करता येते याचा प्रेरणादायी आदर्श ठरली आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना डॉ.रविराज शिंदे यांनी सांगितलं की, या नवजात बाळाला सतत उलट्यांचा त्रास सुरू होता. त्याच्या आई-वडिलांनी इतर ठिकाणी उपचारासाठी प्रयत्नही केले, मात्र बाळाची प्रकृती सुधारत नसल्याने नातेवाईक ते बाळ घेऊन माझ्याकडे आले. तपासणी अंती त्या बाळाला ट्रेकियोसोफेजियल फिस्टुला (TEF) या अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराची लागण झाल्याचं माझ्या निदर्शनास आलं आणि मी उपचार सुरू केले. हळूहळू बाळाचे प्रकृती सुधारत गेली आणि बाळाच्या नातेवाईकांसह आम्ही ही सुटकेचा श्वास टाकला.

ट्रेकियोसोफेजियल फिस्टुला म्हणजे काय ? 

ट्रेकियोसोफेजियल फिस्टुला (TEF) हा अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेणा आजार आहे.या आजारामध्ये श्वासनलिका आणि अन्ननलिका यांच्यात असामान्य जोड निर्माण होते.अशा परिस्थितीत अन्न फुफ्फुसात जाऊन गंभीर निमोनिया होण्याचा धोका असतो. विशेषतः कमी वजनाच्या (लो बर्थ वेट) बाळांमध्ये या आजाराची तीव्रता जास्त असून जिवंत राहण्याची शक्यता खूपच कमी असते.

ग्रामीण भागातील रुग्णालयात अशा प्रकारची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आणि उपचार करणे अत्यंत आव्हानात्मक असते. मोठ्या शहरांतील सुपरस्पेशॅलिटी सुविधांशिवाय अशा बाळांवर उपचार होण्याची शक्यता कमी असते. तरीही तातडीने निर्णय घेऊन शस्त्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले.

ही जटिल शस्त्रक्रिया सोलापूर येथील बालशल्यचिकित्सक डॉ. तडवळकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली. भूलतज्ज्ञ म्हणून अकलूज येथील डॉ. अतुल दोशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान बालरोगतज्ञ व नवजात तज्ज्ञ मी आणि माझी टीम सतत कार्यशील होती. 

शस्त्रक्रियेनंतरही बाळाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पुढील एक महिनाभर बाळाला NICU मध्ये अतिदक्षता उपचार देण्यात आले. या काळात बाळाने गंभीर न्यूमोनिया, सेप्सिस, न्यूमोथोरॅक्स, पर्सिस्टंट पल्मनरी हायपरटेन्शन (PPHN) आणि दूध पचनाशी संबंधित अडचणी यांसारख्या जीवघेण्या गुंतागुंतींवर मात केली.अखेर महिनाभराच्या अथक प्रयत्नांनंतर हे छोटेखानी लढवय्ये बाळ पूर्णपणे बरे होऊन आनंदाने घरी परतले याचा आम्हाला मनोमन आनंद आहे.

“अत्यंत कमी वजन, गंभीर संसर्ग आणि अनेक गुंतागुंती असूनही ग्रामीण रुग्णालयात हे यश मिळवणे ही आमच्या संपूर्ण टीमसाठी अभिमानाची बाब आहे. वेळेवर निदान, तातडीची शस्त्रक्रिया आणि सातत्यपूर्ण अतिदक्षता उपचार यामुळेच हे शक्य झाले,आज अनुश्री चिल्ड्रन्स अँड मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल ला दोन वर्षे पूर्ण होत असून, रुग्णांना माफत दरात सेवा तसेच कौशल्यवान पेडियाट्रिक आणि निओनेटल तज्ञांच्या टीमसोबत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, रुग्णालयाने अनेक बालकांना यशस्वी उपचार दिले आहेत. तर आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना (Mahatma Phule Jan Arogya Yojana) अंतर्गत अनेक रुग्णांना मोफत उपचार सुविधा दिली जात आहेत. भविष्यात, रुग्णालय अधिक सेवा विस्ताराच्या योजना राबवण्याचा आणि रुग्णांना उत्कृष्ट उपचार देण्याचा निर्धार करत आहोत." असे मत डॉ. रवीराज शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow