सांगा शेतकऱ्याने जगावं की मरावं ? साडेसात क्विंटल अन् 664 रुपये ! वाचा काय आहे इन साईड स्टोरी
आय मिरर
पुरंदरमधील शेतकरी सुदाम कोंडीबा इंगळे यांना साडेसात क्विंटल कांद्यासाठी फक्त 664 रुपये मिळाले आहेत. पुरंदर तालुक्यातील वाळुंज या ठिकाणी सुदाम इंगळे यांची शेती आहे.त्यांनी दीड एकर शेतावर खरीप कांद्याचे पीक केलं होतं.त्यासाठी त्यांना लागवड ते काढणीपर्यंत 60 ते 65 हजार रुपये खर्च आला होता. मात्र स्वतःच्या पावसामुळे बऱ्यापैकी कांदा शेतातच सडला गेला जो काही वाचला तो काढणी पाश्चात बाजारात विक्रीसाठी नेला असता त्याला कवडीमोल दर मिळालाय.
विशेष म्हणजे कृषी खात्याकडून या नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याचं सुदाम इंगळे यांनी म्हटलं आहे. अतिवृष्टी पट्ट्यात आपल्या भाग मोडत नसल्याने कृषी खात्याकडून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आल्याचं इंगळे यांचे म्हणणे आहे. माझ्यासह अन्य अनेक शेतकऱ्यांचे या पावसाने नुकसान झालंय मात्र त्यांचे पंचनामे झाले नाहीत असेही इंगळे यांनी म्हटल आहे.
सुदाम इंगळे यांनी त्यांच्या दीड एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना लागवडी पासून आतापर्यंत 60 ते 65 हजार रुपये खर्च आला होता. स्वतःच्या पावसाच्या माऱ्यामुळे शेतातच कांद्याचे पीक सडलं. त्यातूनही काही कांदा बचावला गेला. तो काढणी पश्चात बाजारात पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केटमध्ये विक्रीसाठी नेला मात्र त्यालाही कवडी मोल किंमत मिळाली.
इंगळे यांनी गुलटेकडी येथील कृष्णा रामचंद्र दुर्गे यांच्या आडतीवर 393 किलो कांदे 3 रुपये प्रति किलो दराने तर 202 किलो कांदे 2 रुपये आणि 146 किलो 10 रुपये दराने विक्री केले.यातून त्यांना एकूण 1 हजार 729 रूपये आले.यातून 1065 रुपये वाहतूक,हमाली वीज केल्यानंतर त्यांना 664 रुपये निव्वळ रक्कम हाती आली.
याबाबत सुदाम इंगळे यांनी सांगितलं की, मी अल्पभूधारक शेतकरी आहे, आमचं गाव खरिपाचा गाव आहे. नदीला किंवा विहिरीला आठमाही पाणी असतं. सिंचनाची फार मोठी सोय नाही. या थोड्याशा पाण्यावर खरिपाच पीक घ्यावं म्हणून आम्ही कांद्याची लागवड केली होती. दीड एकर क्षेत्रावर मी कांदा लावला होता. हे पिक एवढं जोमात आलं की त्याला दृष्ट लागली असती. या दीड एकरात जवळपास दोन ट्रक कांदा निघाला असता. परंतु हा सर्व कांदा आम्ही गाडून टाकला.
आज शेतकरी अडचणीत आहे सरकारचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. या कांद्याचे पंचनामे करा म्हणून मी अधिकाऱ्यांना विनंती केली. परंतु आपल्याकडे अतिवृष्टी झाली नाही पंचनामेचे आपल्या जिल्ह्याला आदेश नाहीत म्हणून कोणीही पंचनामे केली नाहीत. शेकडो हजारो शेतकऱ्यांच्या शेतीची माझ्यासारखीच परिस्थिती आहे.
दिवाळीत आणि दसऱ्यात पैसे मिळतात असं कांद्याचं यावर्षीचा नक्की पीक हातातून गेलं. आज आमची काळी दिवाळी चालू आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करायचं? शेतकरी आज मरणाच्या यात्रा सहन करतोय पुढारी मात्र निवडणुकीच्या नादाला लागले आहेत.
केंद्रातील सरकारपासून राज्यातील सरकारपर्यंत किंवा ग्रामीण भागातील आमदारापासून कोणी शेतकऱ्याकडे बघायला तयार नाही. शेतीमालाला बाजार भाव नाही. दीड एकर कांदा मी केला 60 ते 65 हजार रुपये त्यासाठी खर्च झाला. कांदा चांगला आला पण अतिवृष्टीच्या पावसामुळे त्यातील बराचसा कांदा सडला गेला. उरलेला कांदा मजूर लावून कसातरी काढला दुसऱ्या दिवशी पावसात तो पुन्हा भिजला. पंधरा-वीस पिशव्या कशातरी काढल्या लोक त्याला फुकट सुद्धा नेत नव्हती. पुण्याच्या मार्केटला मी तो कांदा पाठवला. गाडी पिशव्या भरणे कांदा काटने गाडीचे भाड हा सर्व खर्च पाहिला तर तर त्याला न परवडणारा भाव मिळाला. 664 रुपये 15 पिशव्याची पट्टी आली.
मी ते सहन करू शकतो पण सर्व शेतकरी ते सहन करू शकत नाहीत अनेक शेतकरी रडत आहेत त्यांची काळी दिवाळी चालली आहे. सरकार मात्र आपल्याकडे बघत नाही या गोष्टीकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. पुरंदर तालुक्यात आता जो कांदा केला आहे काही शेतकऱ्यांनी तो कांदा शेतात गाडला आहे तो पाहून न पाहून सरसकट शेतकऱ्याची पंचनामे करून त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. सरकारने शेतकऱ्याला वाचवावं. शेतकरी जगेल की मरेल याची काळजी सरकारने घेतली पाहिजे, रडून सांगतो कसं पाहिजे तसं सांगतो काय करायचं ते करा शेतकऱ्याचे पंचनामे करा आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या अशी कळकळीची विनंती देवा भाऊ तुम्हाला करतो असं इंगळे यांनी म्हटलं आहे.
या हंगामात मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अद्याप पर्यंत थांबला नाही.राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसह पिकांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. याच पावसाने सुदाम इंगळे यांच्या शेतातील कांदा पिकाचेही नुकसान झाले आहे.पावसामुळे शेतातील कांद्याचे पिक तर गेलेच पण जे काही कसंबसं वाचलं होतं ते बाजारात विक्रीसाठी आणलं असता त्याला कवडीमोल दर मिळाला. मिळालेला भाव त्यातून जाणारा वाहतूक खर्च पाहता इंगळे यांच्या हाती काही रक्कमच पडली आहे.
इंगळे यांनी त्यांच्या कांदा पिकाच्या जोपासणीसाठी आतापर्यंत 66 हजार रुपये खर्च केला होता.मात्र मिळणार बाजार पाहता त्यांना तो आता शेतात गाढणे अधिक फायद्याचं ठरत आहे. किमान त्यातून त्यांच्या शेतीला खत तरी उपलब्ध होईल असं त्यांचं मत आहे.
What's Your Reaction?