माढ्यातील पूरग्रस्तांना इंदापूर आयएमए कडून मदतीचा हात ! तेजपृथ्वी ग्रुपचा ही सक्रिय सहभाग
आय मिरर
सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठाच्या अनेक गावांचे नुकसान झाला आहे यात सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उंदरगाव दारफळ शिंगेवाडी यासह इतर अनेक गावांना याचा फटका बसला आहे.
या महापुरामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले असून त्यांना आता खऱ्या अर्थाने मदतीची आधार देण्याची गरज आहे. सध्या राज्यातून अनेक मदतीची हात पुढे आले असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुकाही सक्रिय सहभागी झाला आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेच्या वतीने पूरग्रस्तांना आवश्यक वैद्यकीय सेवा आणि कौटुंबिक गरजा भागवणारे मदतीचे साहित्य वितरित करण्यात आला आहे तर तेज पृथ्वी ग्रुपच्या माध्यमातूनही या पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर 29 सप्टेंबर रोजी माढा तालुक्यातील शिंगेवाडी येथे पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यात आली ज्यामध्ये आरोग्य सेवा आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी वितरित करण्यात आल्या.
इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूरचे आधारस्तंभ डॉक्टर राम अरणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर अविनाश पाणबुडे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवण्यात आला. इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूरचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर अनिल शिर्के,माजी अध्यक्ष डॉक्टर समीर मगर,सचिव डॉक्टर सुधीर तांबिले,फाउंडेशन सचिव डॉक्टर अतुल वनवे आणि डॉक्टर निलेश कुंभार उपस्थितीत ही मदत वितरित करण्यात आली.
टेंभुर्णी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर दादासाहेब माने यांचंही सहकार्य लाभल्याचं डॉक्टर शिर्के यांनी सांगितले .
इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेच्या सर्व सदस्यांच्या योगदानामुळे ती मदत शक्य झाली. शिंगेवाडी च्या ग्रामपंचायत कडूनही या कामे सहकार्य मिळाले.
यासोबतच भविष्यातही आवश्यक असणारे वैद्यकीय सेवा आणि मदत उपलब्ध करून दिली जाईल असा आश्वासनही ग्रामस्थांना इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेच्या वतीने देण्यात आल्याचेही इंदापूर आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर शिर्के यांनी सांगितले.
तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून मदतीचा हात...
पूर्वग्रस्तांच्या वेदना जाणून घेत त्यांना या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी तेज पृथ्वी ग्रुप च्या अध्यक्षा अनिता खरात यांच्या पुढाकारातून माढा तालुक्यातील उंदरगाव परिसरातील गरजवंतांना मदत पोहोचवण्यात आली आहे. माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष एडवोकेट मीनल साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मदत वितरित करण्यात आली.
तेज पृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून माढा तालुक्यातील उंदरगाव लोंढे वस्ती सावंत वस्ती या परिसरातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आणि मायेचा आधार देण्यात आला. यावेळी तेज पृथ्वी ग्रुपचे सद्दाम बागवान ओंकार सुतार या सह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?