पंतप्रधान मोदींचा बारामती दौरा तूर्तास रद्द ! १२ डिसेंबरला शरद पवारांच्या हस्ते होणार प्रेरणास्थळाचे उद्घाटन

Nov 20, 2026 - 13:53
Nov 20, 2026 - 13:57
 0  152
पंतप्रधान मोदींचा बारामती दौरा तूर्तास रद्द ! १२ डिसेंबरला शरद पवारांच्या हस्ते होणार प्रेरणास्थळाचे उद्घाटन

आय मिरर 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा तूर्तास रद्द करण्यात आलेला आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते बारामती मधील विद्या प्रतिष्ठान संकुलातील नक्षत्र गार्डनमध्ये निर्माण करण्यात आलेल्या प्रेरणास्थळाचं उद्घाटन होणार होतं.मात्र हा दौरा तूर्तास रद्द करण्यात आला असून 12 डिसेंबर रोजी खासदार शरद पवार यांच्या हस्ते या प्रेरणास्थळाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती स्वतः शरद पवार यांनी दिली आहे.

 यापूर्वी तीन नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा होणार होता,मात्र पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर 16 नोव्हेंबर ही तारीख चर्चेत होती. शरद पवार यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे ही तारीख देखील पुढे ढकलण्यात आली होती आणि त्यानंतर आता हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

बारामती मधील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलातील नक्षत्र गार्डनमध्ये एक दोन निर्माण करण्यात आला आहे. यामध्ये एक भली मोठी गौतम बुद्धांची मूर्ती बसवण्यात आली आहे. याशिवाय त्या ठिकाणी काही महापुरुषांचे शिल्प देखील लावण्यात आले आहेत. या संपूर्ण कलाकृतीला प्रेरणास्थळ असं नाव देण्यात आलं आहे.

याच प्रेरणास्थळाचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा मानस माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांचा होता.यापूर्वी तीन नोव्हेंबर पंतप्रधान मोदी यांची बारामती दौऱ्याची तारीख निश्चित झाल्याची माहिती शरद पवार यांनी दिली होती. मात्र काही कारणास्तव हा दबरा पुढे ढकलण्यात आला होता त्यानंतर 16 नोव्हेंबर ही तारीख चर्चेत होती. परंतु शरद पवार यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव सोळा नोव्हेंबर ही तारीख देखील पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता मात्र पंतप्रधान मोदी यांचा बारामती दौरा तूर्तास रद्द करण्यात आला असून 12 डिसेंबर रोजी या प्रेरणास्थळाचे उद्घाटन स्वतः शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow