पुलावरून सेल्फीच्या बहाण्याने पत्नीने नवऱ्याला ढकललं,पण...

Jul 14, 2025 - 21:24
Jul 14, 2025 - 21:26
 0  523
पुलावरून सेल्फीच्या बहाण्याने पत्नीने नवऱ्याला ढकललं,पण...

आय मिरर 

सेल्फी काढताना होणारे अपघात आपण पहिलेच आहेत, पण आता अशी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सेल्फी काढताना नवऱ्याला नदीत ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे.

ही घटना कर्नाटकातील असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कर्नाटकमधील यादगीर येथे ही घटना घडली. बायको माहेरी गेली होती, तिला सासरी परत आणायला पती गेला होता. दोघेही गाडीवरून घरी यायला निघाले होते.

मात्र, घरी येत असताना पत्नीच्या डोक्यात काहीतरी वेगळचं सुरु होतं. पत्नीने आपल्या पतीला नदीच्या पुलावर थांबण्यास सांगितले आणि फोटो काढायला लावले. पुढे तिने सेल्फी काढण्याच्या बहाण्याने नवऱ्याला जवळ बोलावले आणि नदीत ढकलून दिले.

त्यानंतर तिने तिथून पळं काढला आणि घरी जाऊन तिने रडत रडत सगळ्यांना सांगितले की, नवरा नदीत पाय घसरून पडला. मात्र, या घटनेत नवरा नशिबाने वाचला. जेव्हा पत्नीने त्याला धक्का दिला तेव्हा त्याने नदीच्या कठड्यालापकडले आणि मोठ्या दगडावर येऊन पोहचला.

नंतर त्याने मदतीला आवाज दिला तेव्हा लोकांनी धावत त्याची मदत केली. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या घटनेत नवरा सुदैवाने बचावला आणि तो घरी परतला नवऱ्याला समोर बघताच पत्नीची तारांबळ उडते. त्यानंतर तिचा नवरा घरच्यांना सांगतो की, तिने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणानंतर आता नवऱ्याने पत्नीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow