उदाचीवाडी पारगाव मेमाने मध्ये विमानतळ जागेच्या मोजणीला स्थानिक नागरिकांचा विरोध ! अधिकारी स्थानिक नागरिकांमध्ये बाचाबाची...

Feb 13, 2026 - 16:48
Feb 13, 2026 - 17:04
 0  384
उदाचीवाडी पारगाव मेमाने मध्ये विमानतळ जागेच्या मोजणीला स्थानिक नागरिकांचा विरोध ! अधिकारी स्थानिक नागरिकांमध्ये बाचाबाची...

आय मिरर 

पुरंदर तालुक्यातील मधील उदाचीवाडी पारगाव मेमाने या ठिकाणी विमानतळाच्या जागेच्या मोजणीसाठी वन विभागाने ड्रोन च्या माध्यमातून मोजणी चालू केली असता स्थानिक नागरिकांनी या मोजणीला प्रचंड विरोध दर्शवला.यावेळी नागरिक आणि वनविभागाचे अधिकारी आणि सासवडचे तहसीलदार व अधिकाऱ्यांमध्ये तू-तू मै बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं.

पुरंदर तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. यासाठी शासनाकडून जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी या विमानतळासाठी समर्थन दर्शवला आहे.तर काहींचा मात्र अद्याप विरोध कायम आहे.

बाधित होणाऱ्या सातगावंपैकी पारगाव मेमाणे आणि उदाचीवाडी गावातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या विमानतळाचे निर्मितीसाठी देण्यास अद्यापही कायम विरोध दर्शवला आहे. आज पारगाव मेमाने आणि उदाचीवाडी या दोन गावात शासनाकडून ड्रोन द्वारे जमिनीचे मोजमाप सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू होती या प्रक्रियेला स्थानिकांनी कडाडून विरोध दर्शवला.

ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींना सहमती दर्शवली आहे त्यांच्या जमिनी शासनाने मोजणी कराव्यात याबाबत आमचं काहीही म्हणणं नाही मात्र ज्यांनी सहमती दर्शवलेली नाही अशांच्या जमिनी शासनाने मोजायच्या नाहीत आमच्या शेतात यायचं नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. 

पारगाव आणि उदाचीवाडी गावात आज सकाळी सकाळी शासनाचे लोक जमीन मोजणीसाठी आली. या ठिकाणी स्थानिक रहिवासी आहेत त्यांना न विचारता बळजबरीने ड्रोन द्वारे जमिनी मोजमाप करून घेतल्या. शासनाचे लोक आम्हाला सांगत होते की आम्ही फॉरेस्ट ची जमीन मोजली आहे. आम्ही त्याकडे तुम्ही फॉरेस्ट जमिनीची मोजणी केली आहे याचा पुरावा मागितला, मात्र त्यांनी तो दिला नाही. त्यांना फॉरेस्ट ची जमीन मोजायची आहे तर मग आमच्या शेतामध्ये दोन किलोमीटर पुढे ड्रोन कशासाठी जातो असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.

विमानतळाच्या निर्मितीसाठी आम्हाला जमीन द्यायचे नाही त्यामुळे आमच्या जमिनीची मोजणी करू नका. आम्हाला विमानतळाची आवश्यकता नाही. आमचा या विमानतळाला विरोध आहे. आमची सुजलाम सुफलाम जमीन तुम्ही भुरळ पाडून घेत आहात असा आरोप नागरिकांनी केला आहे. 

आम्ही विमानतळ निर्मितीसाठी जर आमच्या जमिनी दिल्या तर आम्ही पुढे काय खायचं आणि कुठे जायचं असा प्रश्न या संतप्त नागरिकांनी विचारला आहे. आम्ही अद्याप पर्यंत आमच्या जमिनीची विमानतळ निर्मितीसाठी सहमती दर्शवलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर बळजबरीने विमानतळ लादून जमिनीची मोजणी करू नये असं उदाचीवाडी आणि पारगाव मेमाने गावातील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतीवाडी करून आम्ही आमचा कुटुंब चालवत आहोत मात्र आम्हाला विश्वासात न घेता या ठिकाणच्या मोजणी या इतर बाबी केल्या जात आहेत ते आम्हाला मान्य नाहीत असंही शेतकऱ्यांचे म्हणणं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow