इंदापूरच्या भिगवण मध्ये मालवाहतूक ट्रकचा अपघात...
आय मिरर
पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये लोखंडी प्लेटा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला असून यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी ट्रकच मोठ नुकसान झालं आहे. काल सोमवारी 28 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे.
पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने लोखंडी प्लेटा घेऊन जाणारा हा ट्रक सर्व्हिस रोडलगतच्या डिव्हायडरला धडकला गेल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.
KA 32 AA 0893 क्रमांकाचा हा मालवाहतूक ट्रक पुण्याकडून सोलापूरकडे अवजड लोखंडी प्लेटा घेऊन निघाला होता. चालकाचं ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तवला जात असून, सुदैवाने यामध्ये कोणतेही जीवित हानी झालेली नाही.
मात्र हा अपघात एवढा भीषण होता की ट्रकचे अक्षरशः दोन तुकडे झाले.पाठीमागील ट्रॉली वेगळी आणि पुढील केबिन वेगळी झाली असून ट्रक मधील सर्व लोखंडी प्लेटा खाली जमिनीवर कोसळल्या गेल्या.
चालक जखमी झाल असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत या संपूर्ण अपघाताचा तपास भिगवण पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?