कर्मयोगीची निवडणूक बिनविरोध करण्यात हर्षवर्धन पाटलांना यश ; हे आहेत नवे शिलेदार
आय मिरर
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 21 संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीतील राजकीय संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला असून राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, राज्याचे माजी मंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना सलग दुसऱ्यांदा निवडणूक बिनविरोध करण्यात यश आलेय.
उमेदवारी माघारीच्या अंतिम दिवशी राजकीय समन्वयातून चित्र बदलले आणि २१ संचालक पदांच्या जागांवरील निवडीचा मार्ग मोकळा झाला.या नूतन संचालक मंडळात विद्यमान चेअरमन हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांचा समावेश आहे.
कारखाना सध्या ओंकार ग्रुप कडे सहयोगी तत्वावर चालवण्यासाठी देण्यात आला असून आर्थिक अडचणी, कारखान्यापुढील आव्हाने आणि बदलती राजकीय समीकरणे आणि सध्याची दुष्काळ स्थिती अशा पार्श्वभूमीवर बिनविरोध झालेली ही निवडणूक इंदापूरच्या सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली आहे.
या चेहऱ्यांना मिळाली संधी...
पाटील हर्षवर्धन शहाजीराव, पाटील राजवर्धन हर्षवर्धन, शुक्ला राकेश रमेशप्रसाद, सरडे रविंद्र वामन, शिदे शांतीलाल दत्तात्राय, भोगळे छगन धोडीबा, देवकर निलेश शामराव, देवकर राजेद्रकुमार प्रतापराव, काळे संतोष लक्ष्मण
देवकर श्रीकांत खिंवराव, खर्चे विजय विठ्ठल, जाधव पराग रमेशराव, निकम रणजित नामदेव, गायकवाड रोहित राजेद्र, नलवडे बिभिषण कल्याण, शिगाडे अतुल शिवाजी, मोहोळकर वसंत खंडू, पारेकर हरिश्चंद्र सदाशिव, पवार रत्नमाला संपत, व्यवहारे सुमन नारायण, जाधव अमोल सुभाष यांचा समावेश आहे.
What's Your Reaction?