खो खो म्हणत श्रीराज भरणे उतरले थेट मैदानात ! पळसदेवच्या बनसुडे विद्यालयातील स्पर्धेत 70 शाळांचा सहभाग 

Sep 9, 2025 - 19:34
Sep 9, 2025 - 19:42
 0  147
खो खो म्हणत श्रीराज भरणे उतरले थेट मैदानात ! पळसदेवच्या बनसुडे विद्यालयातील स्पर्धेत 70 शाळांचा सहभाग 

आय मिरर 

नुकतीच इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पळसदेव विद्यालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी श्रीराज भरणे केवळ उद्घाटन करून थांबले नाहीत तर ते थेट विद्यार्थ्यांसोबत खो खो च्या मैदानात उतरले त्यामुळे पळसदेव मधील ही खो-खो स्पर्धा चांगलीच चर्चेत आली.

तालुकास्तरीय या स्पर्धा तब्बल 70 शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.या खो खो स्पर्धेत 14 व 17 वयोगटातील मुला मुलींच्या खो-खो स्पर्धा पार पडल्या.प्रत्येक वयोगटात अतिशय रंजक व चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या.

 

यामध्ये 14 वर्ष मुली प्रथम क्रमांक श्री शिवाजी विद्यालय वरकुटे बु.च्या मुलींनी 14 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक मिळवला. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायसेवाडी यांनी द्वितीय क्रमांक आणि केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. 

17 वर्षे वयोगटात घोलप वाडी येथील उदमाई विद्यालय यांनी प्रथम क्रमांक तर वरकुटे बुद्रुक येथील श्री शिवाजी विद्यालय यांनी द्वितीय क्रमांक आणि शेटफळ कडे येथील नागेश्वर विद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला.विजेत्या संघाचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.यासाठी पुणे जिल्हा खो खो असोसिएशन, संदीप बल्लाळ प्रसिद्धी समिती सदस्य महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांचे सहकार्य लाभल्याचं संस्थेचे सचिव नितीन बनसोडे यांनी सांगितले.

यावेळी विभागीय क्रीडा अधिकारी महेश चावले, शरद झोळ,उमेश राऊत, दत्तात्रेय व्यवहारे, सरपंच कोमल बनसुडे, उपसरपंच जयश्री शेलार, माजी सरपंच इंद्रायणी सुजित मोरे ,माजी उपसरपंच कैलास भोसले, संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे, कार्याध्यक्षा नंदा बनसुडे, सचिव नितीन बनसुडे,विश्वस्त उमा बनसुडे, अंकुश बनसुडे प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, उपमुख्याध्यापिका सुवर्णा वाघमोडे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow