यावर्षीचा दुष्काळ 1972 पेक्षा ही भीषण ! पण सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा : कृषिमंत्री भरणे यांचं आश्वासन

Nov 21, 2026 - 16:58
 0  123
यावर्षीचा दुष्काळ 1972 पेक्षा ही भीषण ! पण सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा : कृषिमंत्री भरणे यांचं आश्वासन

आय मिरर 

1972 च्या दुष्काळापेक्षा यावर्षीच्या दुष्काळी स्थितीत रब्बी हंगामातील पेरणीचे क्षेत्र प्रचंड घटलं आहे. त्यामुळे आगामी काळात याचा थेट अन्नधान्यावर परिणाम होणार आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती 1972 पेक्षा भीषण असल्याने काळ कठीण असून अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभा असल्याची प्रतिक्रिया राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

याशिवाय अतिवृष्टी धारकांना मदत देण्यासाठी केंद्राने कुठेही हात आकडता घेतला नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना केंद्रानं आश्वासित केलेला आहे त्यामुळे केंद्राकडून कुठेही हात आकडता घेतला जाणार नाही. असा दावाही कृषिमंत्री भरणे यांनी केलाय.

राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर झाली असून 1972 चा दुष्काळ पाहता यावर्षीच्या दुष्काळी स्थितीत रब्बी हंगामाची पेरणी खूप कमी झाली आहे. यावर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.1972 च्या दुष्काळापेक्षा हा दुष्काळ मोठा आहे.1972 च्या दुष्काळापेक्षा यावर्षीचे क्षेत्र वाढायला पाहिजे होते,कारण सिंचन सुविधा मध्ये वाढ झाली आहे.पण रब्बीची पेरणी यावर्षी 1972 पेक्षा कमी झाली आहे.संकट मोठ आहे,जून 2027 पर्यंत आपल्याला या संकटाचा सामना करावा लागणार आहे.

राज्य सरकार मदत करत आहे, शेतकऱ्याच्या पाठीशी कसं उभा राहता येईल यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे.1972 पेक्षा हे संकट खूप मोठ आहे,पेरणीचे क्षेत्र 1972 च्या तुलनेत खूप कमी आहे. असं कृषिमंत्री भरणे यांनी म्हटले आहे.

मदतीसाठी केंद्राचा हात आखडता नाही : मंत्री भरणे

राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते आणि केंद्र सरकारकडे २९,७८१ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून (NDRF) मिळालेली १,००० कोटी रुपयांची रक्कम ही एकूण मागणीच्या केवळ सव्वातीन टक्के (सुमारे ३.३५%) इतकीच आहे. यावर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्राने कुठेही हात आकडता घेतलेला नाही नियम निकषाच्या आधारेच केंद्राला मदत द्यावी लागते. महाराष्ट्र राज्याचा अहवाल आपण केंद्राकडे दाखल केलेला आहे.केंद्राने एनडीआरएफ च्या माध्यमातून मदतीमध्ये वाढ केलेली आहे, वाढीव दुरुस्ती करून हा अहवाल परिपूर्ण करावा लागेल.आपण वेगवेगळ्या माध्यमातून केंद्र सरकारकडे मदत मागत असतो, त्याप्रमाणे केंद्र सरकार मदत द्यायला तयार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पंतप्रधान मोदी साहेब अमित शहा यांच्याशी बोलले, त्यांनी आपल्याला राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत करू असं आश्वासन दिल आहे. केंद्र कुठलाही हात आकडता घेणार नाही जास्तीत जास्त मदत करेल.केंद्राच्या राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत केली जाईल. असं मंत्री भरणे म्हणाले.

वाशिम मधील संत्रा बागा धोक्यात आले आहेत यावरती ही मंत्री भरणे यांनी भाष्य केलं आहे.यावर्षी दुष्काळ आहे,पावसात कालखंड मोठा आहे. एल निनो चे संकट आहे.आपल्याकडे पाऊस पडला नाही. वाशिम काय राज्यात सर्वत्र हीच परिस्थिती आहे.संकट मोठ आहे याचा सामना आपल्याला करावा लागेल.हे नैसर्गिक संकट आहे, मानवनिर्मित नाही असही मंत्री भरणे म्हणाले हे सरकार या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे असा विश्वास ही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

कृषी विद्यापीठात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सवलती...

राज्यातील चारही कृषी अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांना असणाऱ्या सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ही लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना मंत्री भरणे म्हणाले की,राज्य सरकारने हा खूप मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सवलती देतो त्याचप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना चारही कृषी विद्यापीठात सवलती देण्यात येतील असं मंत्री भरणे म्हणाले. 

बारामती विमानतळाच्या सोयी सुविधांसाठी राज्य सरकारने 64 कोटीहून अधिक निधी मंजूर केला यावर बोलताना मंत्री भरणे म्हणाले की हे अंदाजपत्रक विमानतळासाठी काय करणे गरजेचे आहे हे स्वर्गीय नेते अजित दादा होते तेव्हा त्यांनीच केलं होतंपरंतु दादा आपल्यात नाहीत, सुप्रिया सुळे म्हणतात त्याप्रमाणे या गोष्टी अगोदर झाल्या असत्या तर ही वेळ आली नसती,अंदाजपत्रक तयार व्हायला त्याच्या मंजुरी मिळायला आणि अपघात घडायला वेळ आली.दादांचं जाणं हे आपल्या सर्वांच्या दृष्टीतून खूप दुःखदायक घटना आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow