DOUND पाटस गोळीबार प्रकरणी आतापर्यंत 18 जणांवर गुन्हे, दहा जणांना अटक
आय मिरर
पुण्याच्या दौंड तालुक्यातील पाटस मधील श्री सिमेंट कंपनी येथे ट्रक मध्ये सिमेंट भरण्याच्या कारणावरून वाद झाला होता.त्यानंतर या वादातून भर दुपारी हवेत गोळीबार झाला होता. या गोळीबाराच सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे.
या प्रकरणी यवत पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीतून 18 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत त्यापैकी आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे. नऊ जून पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ट्रक चालक सुरज राजेंद्र कु-हाडकर व संतोष बाळकृष्ण कडु यांचे मध्ये पाटस येथील श्री सिमेंट कंपनी पाटस येथे ट्रक मध्ये सिमेंट भरण्याच्या कारणावरून वाद झाला. दरम्यान पाटस येथील गरदडे कॉम्प्लेक्सच्या समोर एकमेका विरूध्द झालेली भांडणे मिटवीण्याच्या चर्चेसाठी बसलेले असताना हा वाद चिघळला गेला आणि त्यानंतर या भांडणादरम्यान हवेत गोळीबार देखील झाला.
अटक केलेल्या संशयित आरोपींमध्ये संतोष बाळकृष्ण कडु रा. बेटवाडी ता. दौंड, सूरज राजेंद्र कु-हाडकर,अजय धोत्रे,श्रीकांत पवार,अनिल चव्हाण सर्व रा. अंबिकानगर पाटस ता. दौड व आण्णा बाबु गायकवाड,रावसाहेब गंगाराम पालवे,सुधीर आण्णा फुलमाळी,रामा बाजीराव गायकवाड,अनिल रामा गायकवाड सर्व रा. जोशीवस्ती ढोकराई फाटा ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर यांचा समावेश आहे.
What's Your Reaction?