छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली
आय मिरर
छत्रपती संभाजीनगर येथे एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे.पुलाचा कठडा तोडून बस थेट पुलाखाली कोसळल्याची घटना समोर आली आहे.
प्रवासी घेऊन पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या खाजगी बस शहरातील केंब्रिजचौका जवळील पुलावरून खाली कोसळली.सदर भीषण अपघातात 1 प्रवासी जागीच ठार झाला. तर 20 पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी आहेत.जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
या दुर्घटनेनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांनी देखील या अपघाताबाबत ट्विट केल आहे.पुण्याहून नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या खासगी बसचा छत्रपती संभाजीनगर येथे झालेला भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारा आहे.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, ही प्रार्थना. असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर शहरातील केंब्रिज चौकाजवळील पुलावर पहाटे खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.माहितीनुसार हा अपघात छत्रपती संभाजीनगरमधील केंब्रिज चौकाजवळील पुलावर पहाटेच्या सुमारास घडला.
खासगी ट्रॅव्हल्स बस पुण्याहून नागपूरच्या दिशेने निघाली होती.बसचा वेग खूप जास्त असल्याने पुलावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले आणि बस कठडा तोडून खाली कोसळली.
या दुर्घटनेत एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. सुमारे २० हून अधिक प्रवासी जखमी झाले असून त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
What's Your Reaction?