भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी बावडा ग्रामपंचायत चा राखला गड
आय मिरर
बावडा ग्रामपंचायत वर हर्षवर्धन पाटील यांची निर्विवाद सत्ता आली असून बावडा हे गाव हर्षवर्धन पाटील यांचे गाव असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात कंबर कसली होती. मात्र 17 पैकी केवळ पाच सदस्य निवडून आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पॅनेलला यश आले आहे तर 17 पैकी 12 जागी भाजप पुरस्कृत पॅनलचे सदस्य निवडून आले आहेत.
यासोबतच सरपंच पदाच्या उमेदवार पल्लवी रणजीत गिरमे या चौदाशे 32 मताधिक्याने सरपंच म्हणून विजयी झाल्या आहेत त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या गावात वर्चस्व कायम राखले आहे. तर इंदापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायत चे निकाल जाहीर झाले असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार ग्रामपंचायत वर झेंडा फडकवला आहे तर एक ग्रामपंचायत स्थानिक आघाडीतून असून बावडा ही ग्रामपंचायत हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात गेली आहे.
बावडा ग्रामपंचायत भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत वर काळेश्वर ग्रामविकास पॅनलने वर्चस्व मिळवले. बावड्यात विजय होताच इंदापुरात जल्लोष साजरा करण्याता ला. हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र नीरा भिमाचे संचालक राजवर्धन पाटील, इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील,उदयसिंह पाटील,किरण पाटील यांना खांद्यावर घेत गुलालाची उधळण करण्यात आली.
What's Your Reaction?