मोठी बातमी | इंदापुरात पिस्टल मधून सुटलेल्या गोळीने एक जण जखमी

आय मिरर
पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील सराटी मध्ये जगदाळे फार्म वरती परवाना असलेलं पिस्टल हलगर्जी पणाने हाताळल्याने त्यातून सुटलेल्या गोळीतून एक जण जखमी झालाय.
काल सायंकाळी चार वाजताच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील जगदाळे फार्म हाऊस वरती ही घटना घडलेली आहे. सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख असं जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील रहिवासी आहेत.
यानंतर इंदापूर पोलिसांनी आता चौघांविरोधात विरोधात गुन्हा दाखल केलाय.1) प्रदिप नानासाहेब जगदाळे राहणार सराटी सराटी तालुका इंदापूर 2) सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख राहणार टेंभुर्णी तालुका माढा 3) विजय शिवाजी पवार राहणार बेंबळे तालुका माढा आणि राजकुमार दिलीपराव पाटील राहणार अकोले टेंभुर्णी तालुका माढा अशी गुन्हा दाखल झालेली यांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल शनिवारी 24 मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील सराटी येथील जगदाळे फार्महाउस वर सुधीर महाडिक देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने हे सर्वजण एकत्र आले होते. याच वेळी राजकुमार दिलीपराव पाटील यांच्याकडील परवानाधारक पिस्टल सुधीर महाडिक देशमुख हातळत होते. आणि याच वेळी या पिस्टल मधून गोळी सुटली ती थेट सुधीर महाडिक यांच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली यामध्ये ते जखमी झाले. त्यांच्यावर सध्या पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून बंदुकीची रिकामी पितळी पुंगळी,एक हुक्का कप पाईप, एक पत्यांचा सेट मिळाला असून पोलिसांनी फरशी वरती पडलेले रक्ताचे नमुने देखील घेतलेले आहेत. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत अधिक तपास करीत आहेत.
What's Your Reaction?






