ते भरलेल्या प्रत्येक टाकीतून सरासरी दोन किलो गॅस काढायचे,भिगवण पोलीसांकडून 'खेळ खल्लास'

Nov 30, 2024 - 14:02
Nov 30, 2024 - 14:07
 0  2132
ते भरलेल्या प्रत्येक टाकीतून सरासरी दोन किलो गॅस काढायचे,भिगवण पोलीसांकडून 'खेळ खल्लास'

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात इण्डेन गॅस कंपनीच्या वितरण एजन्सी मधील कामगारांकडून चक्क घरगुती वापराच्या भरलेल्या टाक्यांमधून गॅस ची चोरी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय.प्रत्येक भरलेल्या गॅस च्या टाकीतून सरासरी २ किलो गॅस काढला जात होता. अखेर या चोरीचं भिंग फुटल असून एका महिला पत्रकाराच्या मदतीने भिगवण पोलिसांनी या गॅस एजन्सीच्या दोघा कामगारांना रंगेहात ताब्यात घेतलयं. पोलिसांनी 47 गॅस च्या टाक्यांसह मिळून एकूण 7 लाख 41 हजार 220 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या संदर्भात भिगवण पोलिस स्टेशन मध्ये अशोक भवरलाल सिया वय 27 वर्षे आणि मुकेश कुवरलाल विष्णोई वय 18 वर्षे राहणार मदनवाडी चौक ता. इंदापुर जि पुणे मुळ रा.वाडी ता. फालूदी जि. जोधपुर राज्य राजस्थान यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 41 हजार रुपये किमतीच्या 47 इण्डेन गॅसच्या टाक्या आणि यासोबत गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वापरण्यात येणा-या लोखंडी नळ्या, प्रत्येक दोन लाख रुपये किमतीची तीन बोलेरो पिक अप वाहने असा एकूण 7 लाख 41 हजार 220 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,इंदापुर तालुक्यातील भिगवण नजीकच्या मदनवाडी येथील अंजली इण्डेन गॅस एजन्सी च्या आवारात पिक अप वाहनात दि.29 नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा कामगारांनी कंपनीचे घरगुती गॅस सिलेंडर मधील ज्वलनशील गॅस हा भरलेल्या 47 सिलेंडरच्या टाकीमधून मोकळ्या सिलेंडरच्या टाकीमध्ये एका लोखंडी पाईपच्या साहय्याने गॅस भरुन चोरी करीत असताना मिळुन आले.त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास भिगवण पोलिस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक विनोद महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा लोडी करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow