मारकडवाडी ग्रामस्थ मतपत्रिकेवर घेणार मतदान ? अभिरूप मतदान प्रक्रियेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी
आय मिरर
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावाने आता चाचणी मतदान घेण्यासाठीची थेट मागणी तहसीलदारांकडे केली आहे. मारकडवाडी गाव हे कायम उत्तम जानकर यांना मताधिक्य देणारे आहे. मात्र या गावात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राम सातपुते यांना मताधिक्य मिळाले. त्यामुळे ईव्हीएम बाबत शंका घेऊन मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर थेट चाचणी मतदान घेण्याचा ठराव केला आहे.
यासाठी येत्या तीन जानेवारीला बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत अशी थेट मागणी शासनाकडे केली आहे.
यासाठी शासनाचे आवश्यक ते शुल्क भरण्याची तयारी देखील मारकडवाडी ग्रामस्थांनी दर्शवली आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या शंकेबाबत आता माळशिरस तालुक्यात थेट मतपत्रिकेवर अभिरूप मतदान घेण्याची तयारी सुरू झाल्याचे दिसून येते.
What's Your Reaction?