बिग ब्रेकिंग || उजनी धरण पन्नास टक्के भरले,उजनी धरणात एकूण 90 टीएमसी पाणी साठा

Oct 3, 2023 - 18:52
 0  2363
बिग ब्रेकिंग || उजनी धरण पन्नास टक्के भरले,उजनी धरणात एकूण 90 टीएमसी पाणी साठा

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसह सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेलं उजनी धरण 50 टक्के क्षमतेने भरले आहे. इतिहासात प्रथमचं मे महिन्यात मायनस मध्ये गेलेली उजनी पूर्ण क्षमतेने भरणार की नाही याची चिंता उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच होती अखेर ऑक्टोबर उजाडताच परतीच्या पावसाने उजनीला तारलं असून उजनी धरण हे 50 टक्के क्षमतेने भरले आहे. सध्या उजनी धरणात एकूण 90 पूर्णांक 63 टीएमसी इतका पाणी साठा आहे. मात्र उजनी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखीन जवळपास 30 टीएमसी पाण्याची आवश्यकता असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरेल अशा शेतकऱ्यांना आहेत.

यावर्षी इतिहासात प्रथमचं 6 मे 2023 रोजी उजनी धरण हे मायनस मध्ये गेलं.2022 च्या तुलनेत एक महिना अगोदर उजनी मायनस गेल्यानं उजनीवर अवलंबुन असणाऱ्या सर्वांचीच चिंता वाढली. यंदाचा पावसाळा सुरू झाला मात्र पावसानं ओढ दिल्याने ऑगस्ट संपून सप्टेंबर उजाडला तरीही उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरू शकलं नाही. मागील वर्षी 12 ऑगस्ट 2022 रोजी उजनी धरण 101 टक्के क्षमतेने भरलं होतं.म्हणजे उजनीत जवळपास 120 टीएमसी च्या आसपास पाणीसाठा होता. यंदा मात्र उलट चित्र होतं त्यामुळे उजनी भरणार की नाही याची चिंता उजनी वर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच होती.अखेर परतीच्या पावसानं उजनीला तारला असून गेल्या आठवडाभरापासून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर सुरू असलेल्या पावसाने उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येत आहे. त्यामुळे आज ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उजनी धरण 50 टक्के क्षमतेने भरले आहे.

शंभर टक्के धरण भरल्यानंतर उजनी धरणामध्ये 117 टीएमसी पाणी साठते. वाढीव उंचीच्या प्रमाणामध्ये 110 टक्के धरण भरल्यानंतर 123 टीएमसी पाणी उजनी धरणामध्ये साठते.117 टीएमसी पाणी साठ्यापैकी 63 टीएमसी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो. सध्या उजनीत 90 टीएमसी हुन अधिक पाणी साठा आहे.तर उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखीन जवळपास 30 टीएमसीहून अधिक पाण्याची आवश्यकताअसणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow