बिग ब्रेकिंग || पुन्हा एकदा गुलाल उधळणार; राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींचं बिगुल वाजलं ०५ नोव्हेंबरला मतदान

Oct 3, 2023 - 18:47
 0  779
बिग ब्रेकिंग || पुन्हा एकदा गुलाल उधळणार; राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींचं बिगुल वाजलं ०५ नोव्हेंबरला मतदान

आय मिरर

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं आहे. राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्य पदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली. यात इंदापूर तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचा आहे समावेश आहे.

कसा आहे निवडणूक कार्यक्रम ? मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्रांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.

 इंदापूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायत साठी होणार मतदान

बावडा, काझड, शेळगाव, वकील वस्ती,शिंदेवाडी, निबोडी यासह काही ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूक होणार आहे , अशी माहिती नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow