इंदापुरातील ऐतिहासिक गढीचा बुरुज धासळला ; शिवप्रेमी आक्रमक झाले शासनाला जमत नसेल तर…वाचा काय दिला इशारा

Oct 3, 2023 - 19:44
Oct 3, 2023 - 19:45
 0  672
इंदापुरातील ऐतिहासिक गढीचा बुरुज धासळला ; शिवप्रेमी आक्रमक झाले शासनाला जमत नसेल तर…वाचा काय दिला इशारा

आय मिरर

पुण्याच्या इंदापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांची ऐतिहासिक गढी असून सततच्या पावसामुळे या गढीच्या पूर्वेकडील प्रवेशव्दारावरचा बुरुज छासळाल्याचं सोमवारी ०२ ऑक्टोंबर २०२३ रोजी समोर आलं.यानंतर शिवप्रेमी आक्रमक झाले असून मंगळवारी ०३ ऑक्टोंबर रोजी इंदापूर तहसिल प्रशासनास निवेदन देत ढासळलेल्या गढीचे बांधकाम श्रमदानातून करण्याची परवानगी मागितली आहे. आणि जर परवानगी नाकारली तर उपोषणाचा इशारा ही देण्यात आला आहे.तहसिलदार श्रीकांत पाटील यांना हे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शिवप्रेमी आणि नागरिक गेली अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांची गढी ही दुरुस्त करून आमचा वैभवशाली इतिहास जपण्याचा प्रयत्न करण्यासाठी मागणी केली होती. शासनाने अनेक वेळा आश्वासने दिली गढीवरती निधी टाकणार असल्याचे जाहीर केले परंतु प्रत्यक्षात निधी टाकला गेल्याचे दिसत नाही व आराखडा तयार केल्याचे ही दिसत नाही अशा परिस्थितीतच कालच्या पावसामुळे गढीचा प्रवेशद्वाराचा भाग ढासळला आहे. 

गढीची दुरुस्ती अथवा नूतनीकरण होण्याऐवजी गढीचे वेगवेगळे भाग सातत्याने पडत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडे मागण्या करून आम्ही शिवप्रेमी नागरिक थकलो आहे. काल गढी चा भाग पडल्यानंतर संपूर्ण शिवप्रेमी हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी जमा झाले होते अत्यंत दुःखी होऊन एक नियोजित कार्यक्रमाप्रमाणे इंदापूरचा इतिहास संपवण्याचे काम केले जात आहे काय ? असा संशय जमलेल्या शिवप्रेमींना आला. त्यावेळी गेल्या अनेक वर्षात याविषयी धरणे आंदोलने झाल्याची चर्चा झाली. गढी चे सुशोभीकरण चे नुसत्या आश्वासन देऊन शिवप्रेमींना फसवल्याचे लक्षात आले म्हणून समस्त शिवप्रेमींच्या वतीने असा निर्णय घेण्यात आला आहे की गुरुवार दिनांक 12 ऑक्टोंबर 2023 पर्यंत जर शासनाने गढी चे ढासळलेल्या बुरुजांचे पुनर्बांधकाम केले नाही तर समस्त शिवप्रेमी स्वतः हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी एकत्र येऊन येऊन श्रमदानाने पडलेले बुरुजाचे बांधकाम सुरू करतील.

सदरची गढी शासनाच्या नावावर असल्याने शासनाची परवानगी असणे आवश्यक आहे.गुरुवारपर्यंत दिनांक 12 ऑक्टोंबर 2023 शासन गढी चे बांधकाम सुरू करणार नसेल तर आम्ही सर्व शिवप्रेमी दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 पासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहोत.

शासनाला बांधकाम करणे शक्य नसल्यास शिवप्रेमी नागरिक श्रमदानाने सदरचे गढीचे बांधकाम करतील. त्यासाठी परवानगी द्यावी जर परवानगी दिली नाही तर शिवप्रेमी 17 ऑक्टोंबर 2023 पासून आमरण उपोषणास बसणार आहोत. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow