बिग ब्रेकिंग | कुंभारगाव येथे स्कूल व्हॅनखाली चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Jan 15, 2025 - 09:58
Jan 15, 2025 - 10:00
 0  478
बिग ब्रेकिंग | कुंभारगाव येथे स्कूल व्हॅनखाली चिमुकल्याचा जागीच मृत्यू

आय मिरर (निलेश मोरे)

स्कूल व्हॅनखाली येऊन दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना कुंभारगाव (ता. इंदापूर) येथे सोमवारी (दि. १३) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. स्वराज महेश काशिद (वय. १ वर्ष १० महिने, रा. कुंभारगाव, ता. इंदापुर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

याप्रकरणी बालकाचे चुलते गणेश बबन काशीद यांनी भिगवण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार वाहनचालक रोहित हनुमंत पवार (ता. इंदापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित पवार हे स्कुल व्हॅन (टाटा विंगर, एमएच.४२/बी.०१९६) ने मुलांना सोडवून जात भरधाव वेगात जात होते. त्यावेळी समोर आलेल्या चिमुकल्याला जोरदात ठोकर बसली. त्यानंतर चिमुकल्याला पुढे ओढत नेल्याने पोटास गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय खाडे करीत आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow