लग्नाच्या आमिषाने चक्क २५ महिलांना लुटले, इंदापूरच्या लखोबा लोखंडेला पुण्यातून अटक !

Jan 14, 2025 - 12:39
 0  2342
लग्नाच्या आमिषाने चक्क २५ महिलांना लुटले, इंदापूरच्या लखोबा लोखंडेला पुण्यातून अटक !

आय मिरर

एकीकडे मुली मिळत नसल्याने लग्न रखडलेल्या तरुणांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे शादी डॉट कॉमच्या माध्यमातून एकाने २५ हून जास्त महिलांना गंडा घातला आहे. लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणाऱ्या आणि मूळचा इंदापूर तालुक्यातील असणाऱ्या फिरोज निजाम शेख वय ३२ वर्ष याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी पुण्यातून अटक केली आहे.

मूळचा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील गंगावळणचा असणारा फिरोज शेख सध्या पुण्यातील कोंडव्यात राहत होता. घटस्फोटित विधवा महिलांना तो लक्ष्य करीत होता. आणि त्यानंतर या महिलांची तो फसवणूक करायचा.त्याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

कोल्हापूरच्या पोलिस पथकाने त्याला पुण्यातून अटक केली आहे.यापूर्वी त्याच्यावर इंदापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, काही ठिकाणी तक्रार अर्ज आहेत.शेख याने २५ महिलांना गंडा घातल्याचे चौकशीत समोर आले. यातील काही महिलांकडून त्याने लाखो रुपये उकळले आहेत. 

अशी घडली घटना....

शहरातील एका घटस्फोटित महिलेने शादी डॉट कॉमवर नाव नोंदणी केली होती. त्यावरून तिचा मोबाइल नंबर मिळवून फिरोज शेख नावाच्या तरुणाने लग्न करण्याची तयारी दर्शवली. महिलेच्या घरी येऊन त्याने इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगितले. त्यानंतर ओळख वाढवून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. व्यावसायिक अडचण असल्याचे सांगून त्याने वेळोवेळी महिलेकडून एक लाख ६९ हजार रुपयांची रोकड आणि आठ लाख २५ हजारांचे दागिने उकळले. लग्नाचा तगादा सुरू होताच त्याने ब्रेन ट्यूमर झाल्याचे सांगत महिलेला टाळण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने १० जानेवारीला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

यानंतर कोल्हापूरच्या पोलिस पथकाने पुण्यातील कोंढवा येथून संशयिताला अटक केली. त्याचे एक लग्न झाले असून, कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow