उजनी पाणलोट क्षेत्रात बोट पलटली ! झालेली घटना दुर्दैवी - हर्षवर्धन पाटील 

May 22, 2024 - 05:20
May 22, 2024 - 05:23
 0  1210
उजनी पाणलोट क्षेत्रात बोट पलटली ! झालेली घटना दुर्दैवी - हर्षवर्धन पाटील 

आय मिरर

उजनी धरण पाणलोट क्षेत्रात कुगाव हून कळाशीकडे येणारी बोट पाण्यामध्ये पलटी होण्याची मंगळवारी (दि.21) सायंकाळी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी व हृदयदावक अशी आहे. या दुर्दैवी घटने संदर्भात युद्ध पातळीवरती मदत व बचाव कार्य करणेसाठी शासकीय यंत्रणा तातडीने कार्यरत झाल्याची माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचेसह इतर विभागाच्या शासकीय यंत्रणेची संपर्क साधून मदत कार्य करणे संदर्भात माहिती घेऊन सूचना दिल्या आहेत. या संदर्भात हर्षवर्धन पाटील शासकीय यंत्रणेची संपर्क ठेवून आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव येथून ही बोट इंदापूर तालुक्यातील काळाशी गावाकडे येत असताना सदरची दुर्दैवी घटना घडली. बोटीतील अनेक व्यक्ती बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow