पुणे सोलापूर मार्गावर पोंधवडी हद्दीत छोटा हत्तीला अपघात ; दहा महिन्याच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू
आय मिरर
पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या छोटा हत्ती ला अपघात झाला आहे. यात दहा महिन्याच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे.चालकाचे नियंत्रण सुटून हे वाहन रस्ता दुभाजकावर आढळून जागीच पलटी झाल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला असून अपघाताचे नेमकं कारण काय आहे याचा तपास पोलीस करत आहेत.
या दुर्घटनेत दहा महिने वयाची एक चिमुकली जागीच मृत्यू पावली आहे. गुरुवारी दि. ०२ नोव्हेंबर रोजी चार ते सव्वाचार च्या सुमारास हा अपघात घडला आहे.यशोदा सुरेश देवकर वय १० महिने असं मृत्यू पावलेल्या चिमुकलीचं नांव आहे.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोंधवडी गावच्या हद्दीत एम.एच.१४ एच.यु.३३५२ क्रमांकाच्या छोटा हत्ती वरील चालकाचे नियंत्रण सुटले असावे आणि वाहनाचे पुढील चालकाच्या बाजूचे चाक रस्ता दुभाजकावरती आदळले गेल्याने हे वाहन महामार्गावर जागीच पलटी झाले असावे.मात्र नक्की कोणत्या कारणाने अपघात झाला याचा तपास आम्ही करत आहोत.
या छोटा हत्ती मध्ये एकूण आठ प्रवासी होते.ते सोलापूर जिल्ह्यातील पेनूर वरून शिरूर ला चालले होते.त्यापैकी दहा महिण्याची चिमुकली मृत्यू पावली असून इतर प्रवासी जखमी झाले आहेत. कल्याण मरेप्पा देवकर वय ६५ वर्षे, मालन कल्याण देवकर वय ६० वर्षे,शांताबाई कल्याण देवकर वय ६० वर्षे,सुरज मरेप्पा देवकर वय २२ वर्षे,अमृता सूरज देवकर वय २१ वर्षे,रावसाहेब शाम पवार वय २५ वर्षे,दुर्गा शाम पवार वय ३५ वर्षे हे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच इंदापूर पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक, महेश कुरेवाड, सहा.पो.उप. निरीक्षक संतोष काळे, पो.हवा.नितीन वाघ, तानाजी लोंढे, उमेश लोणकर यांसह भिगवण पोलीस ठाण्याचे सहा.पो. उप.निरीक्षक दत्तात्रय सोननिस व त्यांचे सहकारी आणि एन.एच. ए.आय.चे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.जखमींना तात्काळ उपचार कामी भिगवण येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.
What's Your Reaction?