भिगवणमध्ये भिषण अपघात, पुलावरून कंटेनर खाली कोसळला,चालक जागीच ठार

Mar 16, 2025 - 07:36
 0  500
भिगवणमध्ये भिषण अपघात, पुलावरून कंटेनर खाली कोसळला,चालक जागीच ठार

आय मिरर (निलेश मोरे)

भिगवण, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेने निघालेला भरधाव कंटेनर कठड्याला धडकून सेवा रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. भिगवण (ता. इंदापूर) हद्दीतील मदनवाडी चौकात आज शनिवारी (ता. 15) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. 

श्रवणकुमार भगवती प्रसाद यादव, (वय -37, रा. मुंबई मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर चालक श्रवणकुमार यादव हा पुणे – सोलापूर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने निघाल होता. भिगवण परिसरातील मदनवाडी चौकात आले असता चालक श्रवणकुमार यादव याचा कंटेनरवरील ताबा सुटला. यामध्ये कंटेनर हा पुलावरून 20 ते 25 फुट सेवा रत्यावर पडला.

दरम्यान, या अपघातात ट्रक कंटेनर चालक श्रवणकुमार यादव याला मोठ्या जखमा झाल्या होत्या. स्थानिक नागरिक व आपुलकीच्या सेवा रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. पुढील तपास भिगवण पोलीस करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow