त्यांनी कळंब,नाशिक,पनवेल विजापूर मधून चारचाकी चोरल्या पण बावड्यातील प्रकरणात ते इंदापूर पोलिसांपासून वाचू शकले नाहीत

आय मिरर
चारचाकी वाहने चोरणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना इंदापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून इंदापुरातील बावड्यातून चोरी केलेली बोलेरो गाडी सह शिकापूर पोलीस ठाणे हद्दीतून तसेच खेड तालुक्यातील चोरी केलेली दोन पिक अप वाहने आणि चोरी करताना वापरलेली इंडिका कार असा १० लाख रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय.तर आणखी वाहने हस्तगत होण्याची शक्यता असल्याचं इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी म्हटलं आहे.
अब्दुल रहिम अब्दुल करिम शेख वय ५२ वर्षे, रा. दिलावरनगर, बीड आणि बशीर बनिमीया शेख वय ४२ वर्षे एकतानगर, जूना बस डेपो, धाराशिव अशी अटक करण्यात आलेल्यांची नांवे आहेत.
इंदापूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २४ आँगस्ट २०२३ रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील बावडा येथून घराजवळ लावलेली बोरेरो गाडी चोरी गेल्याची तक्रार इंदापूर पोलीसात दाखल करण्यात आली होती.
या गुन्ह्याचा छडा लावणे अवघड काम होते कारण कोणतेही पुरावे पोलीसांच्या हाती नव्हते. असं असताना इंदापूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने इंदापूर, अकलूज, बारामती, बीड, धाराशिव शहरा पर्यंतचे शेकडो सीसीटिव्ही कॅमेरेचे फुटेज तपासली. यासोबतचं तांत्रिक माहितीवरून या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलीसांच्या पथकाला यश आले.
सदरचे आरोपी हे सराईत चारचाकी वाहन चोर असून त्यांच्यावर यापुर्वी कळंब, नाशिक, पनवेल विजापूर (कर्नाटक) येथे चारचाकी वाहने चोरीचे गुन्हे नोंद असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे स.फौज. प्रकाश माने, कचरू शिंदे, पो. हवालदार ज्ञानेश्वर जाधव, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्टेबल नंदू जाधव, विशाल चौधर, गणेश डेरे, गजानन वानोळे, होमगार्ड संग्राम माने, लखन झगडे यांनी केलेली आहे.
What's Your Reaction?






