सोशल मीडियात वादग्रस्त पोस्ट केल्यास इंदापूर पोलीस करणार कारवाई
आय मिरर
लोकसभेचा निकाल जाहीर होताच सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर सोशल मीडियात वादग्रस्त पोस्ट पोस्ट करणाऱ्यांवर इंदापूर पोलीस कारवाई करणार आहेत. पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.
कोकणे म्हणाले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा निकाल दि. 04 जून रोजी रोजी जाहीर होणार असुन त्या अनुषंगाने कोणीही नागरिक सदर निवडणुक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मिडीयाच्याद्वारे फेसबुक, इन्टाग्राम, व्हॉटसअँप ग्रुप व इतर तत्सम अँप्लिकेशन च्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या, धार्मीक भावना दुखावतील अशा स्वरुपाच्या पोस्ट, कमेंट, स्टोरी, स्टेटस, डिजीटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करु नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करु नये. डी.जे. सांउड सिस्टीम वाजवनार नाहीत, फटाके फोडणार नाहीत, तसेच विना परवाना विजयी मिरवणुक काढु नये.
तसेच व्हॉटसअप ग्रुप चे अँडमिन यांनी दि. 03 जून 2024 ते दि. 05 जून 2024 या कालावधीमध्ये त्यांचे ग्रुपचे सेटिंग मध्ये only admin करुन बदल करुन घ्यावा, जेणेकरुन ग्रुपधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाहीत. जर अँडमीन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणा-या सदस्यासह ग्रुप अँडमीनला जबाबदार धरुन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
What's Your Reaction?