इंदापूर शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुख पदी ॲड.आनंद केकाण तर उपशहरप्रमुख पदी शाबूद्दीन सय्यद 

Apr 30, 2025 - 06:58
Apr 30, 2025 - 06:58
 0  204
इंदापूर शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुख पदी ॲड.आनंद केकाण तर उपशहरप्रमुख पदी शाबूद्दीन सय्यद 

आय मिरर

शिवसेना शिंदे गटाच्या इंदापूर शहर प्रमुख पदी प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट आनंद केकाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर उपशहर प्रमुख पदी शाबुद्दीन सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नुकतेच त्यांना या निवडीचे पत्र जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा प्रमुख सिमा प्रशांत कल्याणकर ही उपस्थित होत्या.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्ववाचे धगधगते विचार घेऊन पुढे घेऊन जात असताना शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मार्गदर्शक सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी आपण काम करणार असल्याचे या निवडीनंतर ॲडव्होकेट केकाण यांनी सांगितले.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय चौफुला येथे या निवडीची नियुक्तीपत्र ॲडव्होकेट केकाण आणि सय्यद यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामीण भागात पक्ष वाढीच्या दृष्टीने पासलकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow