मोठी बातमी | अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा, संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोन महिन्यानंतर मुंडेंचा राजीनामा

Mar 4, 2025 - 10:40
Mar 4, 2025 - 10:47
 0  485
मोठी बातमी | अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा, संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोन महिन्यानंतर मुंडेंचा राजीनामा

आय मिरर

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला आहे.धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा राजीनामा दिला आहे. अखेर दोन महिन्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे.

काल सातपुडा बंगल्यावरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली आणि या बैठकीतच धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या अशी सूत्रांची माहिती आहे. अखेर आज धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात असणारा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे आणि त्यामुळेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी गटातील नेत्यांकडून मागील दोन महिन्यापासून केली जात होती. भाजपच्या आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनामाची मागणी केली होती.

धनंजय मुंडे हे सातपुडा बंगल्या वरती आहेत मात्र सकाळपासूनच सातपुडा बंगल्या वरती पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. काल सातपुडा बंगल्यावरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची बैठक पार पडल्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.

संतोष देशमुख यांना न्याय द्या अशी मागणी केली जात होती.काल अखेर संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली त्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow