भाषणासाठी लागणारे संदर्भ वाचनातून चांगल्यारितीने मिळतात - चंद्रकांत पाटील

Jan 14, 2024 - 11:19
Jan 14, 2024 - 11:20
 0  56
भाषणासाठी लागणारे संदर्भ वाचनातून चांगल्यारितीने मिळतात - चंद्रकांत पाटील

आय मिरर

वाचनाची आवड असल्यास समाजमाध्यमांचा परिणाम होत नाही. आवड असली तर वाचनासाठी वेळ काढता येतो असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले ते भाटनिमगाव येथील श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालयात नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले अलिकडच्या काळात वाचनासाठी वेळ मिळणे कठीण आहे अशावेळी एखाद्या वाचन करणाऱ्या व्यक्तीकडून विषय समजावून घेतल्यास त्याचा उपयोग होतो. भाषणासाठी लागणारे संदर्भ वाचनातून चांगल्यारितीने मिळतात. ज्ञानेश्वरीपासून आपल्या वाचनाची सुरूवात झाली असल्याचे ना पाटील म्हणाले.

यावेळी श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी यादी तयार करून गावातील नागरिकांना व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांना त्यांच्या रजिस्टरला नोंदी ठेवून पुस्तके पुरवावीत त्यासाठी मदत करण्यास तयार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीसाठी दहा लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्या इमारतीची पाहणी पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला. कृषी, दूध उत्पादक,फळबाग लागवड करणारे शेतकरी, तसेच गावातील सांप्रदायिक मंडळातील वारकरी यांच्याशी पाटील यांनी संवाद साधत गाव व परिसरातील माहिती घेतली.

यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील,पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस सहाय्यक निरीक्षक तुकाराम सातव, सरपंच अजित खबाले,खरेदी विक्री संघाचे चेअरमन पंजाबराव, गायकवाड,संचालक शांतीलाल शिंदे,नानासाहेब भोसले, मोहन खबाले,मनोहर भोसले, भागवत शिंदे,लहू भोसले, अमोल इंगळे,सचिन कांबळे, गणेश पोळ, संतोष मगर, प्रीतम जगताप, श्रीमंत खबाले, महादेव खबाले,मेघराज भोसले, नागनाथ खबाले, शरद गवळी, उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशीलकुमार शिंदे यांनी केले तर आभार अनिल पवार यांनी व्यक्त केले.

चंद्रकांत पाटीलांनी वाटले तिळगुळ…

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गावातील उपस्थित सर्व लहान मुलांना चॉकलेट तसेच उपस्थित सर्व नागरिकांना तिळगुळ स्वतःच्या हाताने वाटप केली. व संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा साधेपणा गावकऱ्यांना चांगलाच भावला..

चंद्रकांत पाटील यांनी दिली गाई गोठ्याला भेट…

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाटनिमगाव येथील विजय शिंदे यांच्या नवीन बांधलेल्या गाई गोठ्याला भेट दिली यावेळी बोलताना ते म्हणाले युवकांनी व्यवसायात उतरून स्वतःचा एक ब्रँड तयार केला पाहिजे. दुधापासून उपपदार्थ तयार करून त्यांची बाजारात विक्री केली तर व्यवसाय अधिक यशस्वी करता येतो. हजार लिटर दुधाचा टप्पा पार केल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी भेट देणार असल्याचे पाटील म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow