BIG BREAKING चोरटा हुशारच म्हणायचं की,त्यानं थेट पोलिसांचेच मोबाईल चोरले,दौंड मध्ये काय घडलं ?

आय मिरर
दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलाच्या बॅरेकमधून चार पोलिसांचे मोबाईल आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी झाली आहे. राज्य राखीव पोलिस दलाची अंतर्गत सुरक्षा भेदून ही चोरी करण्यात आली आहे. या संदर्भात आता दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे अंतर्गत सुरक्षा भेदून ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. जर पोलीसच सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेचा काय असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.
दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाच मधील बॅरेक येथे ३ मार्च रोजी रात्री दहा ते ४ मार्च रोजी रात्री साडेबारा च्या दरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,पोलिस बॅरेकमध्ये एकूण सात पोलिस अंमलदार होते. चोरट्याने पोलिस अंमलदार रिझवान फारुख शेख, जालिंदर बाबूराव भाबड, योगेश सुरेश किकले व अक्षय मनोज चव्हाण यांचे मोबाईल चोरले.याचबरोबर रिझवान शेख यांची बॅग चोरली व त्या बॅगेत चार हजार रुपयांची रोकड, एटीएम कार्ड, आधार कार्ड,मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड होते.ही महत्वाची कागदपत्र देखील चोरीला गेली आहेत.
तर पोलीस अंमलदार सावकार मच्छिंद्र वाघ यांची बॅग चोरीस गेली. त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, नोकरी रुजू होण्याचे पत्र, जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, आदी कागदपत्रे होती.
What's Your Reaction?






