ब्रेकिंग | इंदापुरात कारचा भीषण अपघात,रस्ता दुभाजकाला मधोमध धडकून जागीच दोन ते तीन पलट्या

आय मिरर
इंदापूर शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे सोलापूर महामार्गावर देवीच्या मंदिराच्या समोर स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला आहे. स्विफ्ट कार रोडच्या मधोमध असणाऱ्या रस्ता दुभाजकाला धडकली गेली यात कारच्या जागीच दोन ते तीन पलट्या झाल्याची माहिती मिळत आहे.
इंदापूर मधून सोलापूरच्या दिशेने निघालेली MH 42 H 2284 क्रमांकाची कार चालकाचा ताबा सुटल्याने रस्ता दुभाजकाला मधोमध धडकली गेली असावी असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात इतका भीषण होता की कारच्या दोन ते तीन पलट्या झाल्या.कारचा वेग प्रचंड असल्याने कार ने जागीच दोन ते तीन पटल्या खाल्या शिवाय या अपघातात कार देखील प्रचंड नुकसान झाले आहे.यात कार चा चालक जखमी झाला आहे.
दरम्यान अपघात घडताचं स्थानिक नागरिक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले त्यांनी कार मधील जखमींना बाहेर काढलं.शिवाय घटनास्थळी इंदापूर पोलिस देखील दाखल झाले होते.
What's Your Reaction?






