बीडमध्ये नक्की चाललय तरी काय ? चक्क पोलिसानेच एसपी कार्यालयातून 10 बॅटऱ्या चोरल्या
आय मिरर
बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच तब्बल दहा बॅटऱ्यांची चोरी झाल्याची घटना समोर आलीय. आधीच बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना आता पोलीस मुख्यालयातूनच चोरीची घटना समोर आल्यानं चर्चेचा विषय बनला आहे.
या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावरच गुन्हा दाखल आहे. अमित सुतार आणि माधव जानकर असे आरोपींची नावे असून सुतार हे सहाय्यक फौजदार आहेत. तर जानकर हा दुकानदार आहे. नोव्हेंबर महिन्यात सुतार याने तीन बॅटऱ्या चोरी केल्या. तर 25 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आणखी सात बॅटऱ्यांची चोरी झाली.
अमित सुतार हे वायरलेस विभागात कार्यरत आहेत. पोलीस उपनिरीक्षकाच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलाय. परंतु थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच चोरीचा प्रकार समोर आल्याने या घटनेची चर्चा रंगू लागली आहे.
What's Your Reaction?