भीमा नदी पात्रात होडीत बुडालेल्या त्या सहा लोकांचा शोध पुन्हा सुरू

May 22, 2024 - 07:46
May 22, 2024 - 07:48
 0  674
भीमा नदी पात्रात होडीत बुडालेल्या त्या सहा लोकांचा शोध पुन्हा सुरू

आय मिरर

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भीमा नदी पात्रात मंगळवारी 21 मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास प्रवासी वाहतूक करणारी होडी (लॉन्च) ही वादळी वाऱ्याचा फटका बसून भीमा नदी पात्रात बुडाली गेली. यात एकूण सात प्रवासी होते त्यापैकी एक व्यक्ती पोहून पाण्यातून बाहेर आला त्यामुळे त्याचा जीव वाचला इतरांचा मात्र अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही.

ही दुर्घटना समजतात इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार दत्तात्रय भरणे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांसह बारामती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर,तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे घटनास्थळी दाखल झाले होते. या लोकांचा शोध घेण्यासाठी या सर्वांनीच शर्तीचे प्रयत्न केले. दरम्यान ही घटना दुर्दैवी असून पाण्यात बुडालेल्या या सर्वांना वाचविण्यासाठी आपण प्रशासनाशी बोललो आहे तात्काळ मदत मागवली असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

दुर्घटनेतून वाचून पाण्याबाहेर आलेले पोलीस अधिकारी राहुल डोंगरे यांनी ग्रामस्थांना हा किस्सा सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस पडली आणि तेव्हापासून शोध मोहीम सुरू झाली. करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील काळाशी अशी या होडी (लाँच) मार्फत प्रवासी वाहतूक केली जाते आणि याच दरम्यान काळाशी येथून कुगावकडे परतत असताना भीमा नदी पात्रात ही दुर्घटना घडली.

घटना समजल्यापासून महसूल विभाग पोलीस प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून सहा ते सात बोटीच्या माध्यमातून या सहा लोकांचा शोध घेतला जातोय.रात्री उशिरा नऊ वाजेपर्यंत ही शोध मोहीम सुरू होती.मात्र रात्रीच्या अंधारामुळे आणि वादळ वाऱ्यामुळे ही शोध मोहीम थांबवण्यात आली. रात्री प्रयत्नांची पराकाष्टा करूनही या सहा लोकांचा शोध लागला नाही. त्यानंतर एनडीआरएफ तुकडी दाखल झाली असून आज सकाळी साडेसात वाजल्यापासून पुन्हा ही शोध मोहीम सुरू झालेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या सहा लोकांमध्ये एक महिला तीन पुरुष आणि दोन लहान बालकांचा समावेश आहे.

गेल्या तीन-चार दिवसापासून वादळ वाऱ्याचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय आणि याच वादळ वाऱ्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आपण पाहत आहोत त्यामुळे पाण्यामधून नावेतून प्रवास करताना अधिकची सतर्गता बाळगणं गरजेचं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow