6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू ! ट्रकला धडकून बस पेटली, उरला फक्त सांगाडा

May 15, 2024 - 12:26
May 15, 2024 - 12:30
 0  1689
6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू ! ट्रकला धडकून बस पेटली, उरला फक्त सांगाडा

आय मिरर

ट्रकला धडकून बसचा भीषण अपघात झाला आहे. ट्रकला धडक दिल्यानंतर बसने अचानक पेट घेतला आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहे. या भीषण दुर्घटनेत 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात हैदराबाद-विजयवाडा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.

बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भयंकर होती त्यात 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला. बापटला इथून हैदराबादकडे जाणाऱ्या बस आणि ट्रकची धडक झाली. या धडकेमुळे लागलेली आग इतकी भीषण होती की बस आणि ट्रक पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या बसचा फक्त सांगाडा उरला आहे. या अपघातात 32 जण जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बस आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याचं दिसत आहे. या धडकेमुळे लागलेली आग इतकी भीषण होती की बस आणि ट्रक पूर्णपणे जळून खाक झाले. आगीचे लोळ उंच उंच होत होते. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र तोपर्यंत फक्त सांगाडा उरला होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow