बिग ब्रेकिंग | नाराजीच्या चर्चांना फुल स्टॉप ! कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पदभार स्वीकारला

Jan 7, 2025 - 13:27
 0  370
बिग ब्रेकिंग | नाराजीच्या चर्चांना फुल स्टॉप ! कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पदभार स्वीकारला

आय मिरर

गेल्या काही दिवसापासून कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे हे समाधानकारक खातं न मिळाल्याच्या मुद्द्यावरून नाराज आहेत अशा चर्चा होत्या,यावरती दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर आज दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयातील दालनामध्ये क्रीडा युवक व अल्पसंख्यांक विकास औकाफ या खात्यांचा पदभार स्वीकारला आहे.

यावेळी क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक नवनाथ फडतरे यांसह अधिकारी उपस्थित होते.

क्रीडा, युवक कल्याण विभाग, अल्पसंख्याक, औकाफ विभागाच्या माध्यमातून राज्याच्या प्रगतीत भरीव योगदान देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. अल्पसंख्याक घटकांसाठी कल्याणकारी योजना राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी आग्रही असेल असं मंत्री भरणे यांनी म्हटल आहे.

यावेळी जलतरण क्रीडा प्रकारात योगदान देणारे पद्मश्री मुरलीधर पेटकर यांना केंद्र शासनाच्यावतीने अर्जुन (जीवन गौरव) पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांना सन्मानित केले. त्याचबरोबर क्रीडा मार्गदर्शक दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, गोळाफेक क्रीडा प्रकारात सचिन खिल्लारी यांना अर्जुन पुरस्कार, शुटींग क्रीडा प्रकारात स्वप्निल कुसाळे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांना सन्मानित केले. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवित देशाबरोबर राज्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत सर्व पुरस्कार विजेत्यांना मंत्री भरणे यांनी शुभेच्छा दिल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow