शरद पवार इंदापूरात नवीन पत्ता उघडण्याच्या तयारीत ? प्रवीण मानेंच्या सोनाई पॅलेसवर आज पार पडणार खा.सुळेंच्या उपस्थितीत कार्यकर्ता संवाद बैठक
आय मिरर
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज सोमवारी २५ सप्टेंबर रोजी इंदापूर तालुक्याचा दौरा करणार आहेत. राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा खा.सुळे मागील आठवड्यापूर्वी प्रथमचं इंदापूरच्या दौ-यावर आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुप्रिया सुळे इंदापूरचा दौरा करणार असून या दौ-यात सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांच्या सोनाई पॅलेस वर कार्यकर्ता संवाद बैठक पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.त्यामुळे उद्याच्या विधानसभेच्या दृष्टीने खा.शरद पवार इंदापूरात नवा पत्ता उघडण्याच्या तयारीत तर नाहीत नाहीत ना ? असा प्रश्न निर्माण झालाय.
२०१९ च्या विधानसभेनंतर इंदापूरच्या राजकाणात दिग्गज समजलं जाणारं माने घराणं आमदार दत्तात्रय भरणे यांच्या स्टेजवर आजपर्यंत सहसा पहायवयास मिळाले नाही.२०१९ पासून केवळ सुप्रिया सुळे यांच्या मंचावर येणचं माने परिवाराने पसंद केल्याने माने आणि भरणे परिवारातील दुरावा इंदापूरकरांना उघडपणे पहायला मिळाला.तर राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर आमदार भरणे यांसह जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांसह दिग्गज नेत्यांनी खा. शरद पवार, खा.सुप्रिया सुळे यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपलं समर्थन दर्शवलं. त्यामुळे हक्काचा मतदारसंघ समजल्या जाणा-या इंदापूर मतदार मतदारसंघात सुळे एकट्या पडल्या.
आम्ही अजित दादांसोबत आहोत असं ठणकावून सांगताना आमदार भरणे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांकडे आपले हात टेकून ठेवलेत. मात्र पक्ष फुटीनंतर जेव्हा सुळे बेलवाडी येथे सांत्वन भेटीसाठी प्रथम आल्या त्यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वागतासाठी उपस्थीत होते परंतु भरणे यांनी स्वागतास जाणे टाळले. त्यानंतर भांडगांव येथील कार्यक्रमात उलट चित्र पहायाला मिळाले सुळे यांच्या बेलवाडी येथील सांत्वन भेटीवेळी स्वागतास उपस्थित असणारी राष्ट्रवादीची दिग्गज नेतेमंडळी आणि नेते आ. भरणे ही तिथे अनुपस्थिती होते.
भांडगाव येथील कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांच्या मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस मधील युवा चेहरा प्रवीण माने आणि डाॅ.शशिकांत तरंगे एकत्र दिसून आले.हे दोन्ही युवा चेहरे अगदी पंढरपूर पर्यंत सुळे यांच्यासोबत होते.त्यानंतर आता सुळे आज सोमवारी इंदापूरचा दौरा करणार असून या दौऱ्यात इंदापूरच्या राजकारणातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या प्रवीण माने यांच्या इंदापूर मधील सोनाई पॅलेस वरती कार्यकर्त्यांची संवाद बैठक पार पडणार आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेय.
शरद पवारांनी ज्या दत्तात्रय भरणेंना आमदार केलं आणि राज्य मंत्री मंडळात स्थान दिलं तेच भरणे वा-यासरशी फिरले अन् अजित पवारांना स्वीकारत दादाचं आमचे नेते म्हणत आपला पाठींबा दर्शवला. दत्तात्रय भरणे हे आगामी विधानसभेत तिस-यांदा विजयी झाले तर भरणे यांची ती विजयी हॅट्रीक असणार आहे. मात्र याच ठिकाणी शरद पवार आपला पत्ता बाहेर काढून थेट भरणेंनाचं शह देण्याच्या तयारीत तर नाहीत ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
२०१९ च्या इंदापूर विधानसभा निवडणूकीत आमचं ठरलयं म्हणतं प्रवीण माने यांनी आमदारकीची तयारी दर्शवली होती. मात्र पक्ष प्रमुख शरद पवारांच्या आणि खा.सुप्रिया सुळे यांच्या सांगण्यावरुन ते त्यावेळी थांबले असल्याचं सांगितले जातेय. मात्र सध्या राष्ट्रवादीत पडलेली फुट आणि भरणेंनी अजित पवारांना दर्शवलेले समर्थन पाहता उद्याची विधानसभा प्रवीण माने शरद पवार गटाकडून लढवतील का ? हे पहावे लागणार आहे
What's Your Reaction?