मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शरद पवार एकाच मंचावर येणार

Sep 7, 2023 - 07:03
 0  653
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शरद पवार एकाच मंचावर येणार

आय मिरर

पुणे येथील कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया (कोजन इंडिया) यांच्यावतीने देण्यात येणार्‍या देशपातळीवरील नॅशनल कोजनरेशन पारितोषिके 2023 चे वितरण पुढील शनिवारी (दि.16) वाकड येथील हॉटेल टीप टॉप येथे होत आहे.

कोजन इंडियाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. हे सर्वजण उपस्थित राहिल्यास राज्यातील सत्ताबदलानंतर ते प्रथमच एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

कोजन इंडियाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर हेसुध्दा उपस्थित राहणार आहेत. पारितोषिकामध्ये वैयक्तिक श्रेणीअंतर्गत 16 विजेत्यांच्या घोषणेचा समावेश आहे. तसेच संस्थात्मक श्रेणीअंतर्गत 12 विजेत्यांना पारितोषिके मिळतील. सलग दुसर्‍या वर्षी पुनःश्च विजेते झालेल्यांना नियमित पुरस्कारांऐवजी खास श्रेणीतील पारितोषिक विजेते म्हणून सन्मानित करण्यात येईल. साखर कारखाना संकुलांकरिता हरीत नूतनीकरणीय ऊर्जेचे एकात्मिक धोरण या सदराखाली चर्चासत्र होईल. यामध्ये जैविक इंधन कार्यक्रम, जैविक गॅस प्रकल्पांची शाश्वतता, एकात्मिक जैव रिफायनरी, सहवीज निर्मिती आणि हायड्रोजन निर्मितीमधील समन्वय आणि सौरऊर्जा या विषयावर माहितीची देवाणघेवाण व चर्चा होईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow