युट्यूब पाहून शिकला चोरी ; मौजमस्तीसाठी वर्षभरात केल्या 93 चोऱ्या, गोव्यात जाऊन उडवायचा पैसे

Jun 1, 2024 - 07:37
Jun 1, 2024 - 07:38
 0  466
युट्यूब पाहून शिकला चोरी ; मौजमस्तीसाठी वर्षभरात केल्या 93 चोऱ्या, गोव्यात जाऊन उडवायचा पैसे

आय मिरर

संपूर्ण देशात दिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्यास वर्धा पोलिसांनी अटक केली. वर्धा जिल्ह्यात चार घरफोड्या करून फरार होण्याच्या प्रयत्नात असतांना पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. याने मागील एका वर्षात संपूर्ण देशात ९३ चोरीच्या घटना केल्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

प्रशांत काशिनाथ करोशी राहणार इस्कुर्ली जिल्हा कोल्हापूर असं आरोपीच नाव आहे. वर्धा शहरासह परिसरात चोरी आणि घरफोडींच्या घटना सातत्याने घडत होत्या. चोरट्याला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिस विभागासमोर उभे ठाकले असतांना शहर पोलिसांनी गस्तीदरम्यान अट्टल घरफोड्या प्रशांत काशीनाथ करोशी (रा. इस्कुर्ली, जि. कोल्हापूर) याला जेरबंद केले. त्याने शहरात चार घरफोड्या केल्याची कबुली दिली. तर पोलिसांनी चोरी झालेला सर्व असा एकूण ७ लाख २० हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले.

संबंधिताची कसून चौकशी केली असता आरोपीकडून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या. आरोपीने या एका वर्षात संपूर्ण देशात ९३ चोरीच्या घटना केल्याचे समोर आले. प्रशांत याने २०१८ मध्ये ३२ तर २०२० मध्ये २२ घरफोड्या कोल्हापूर येथे केल्याने त्याला पोलिसांनी अटक करून ५४ घरफोडीचे गुन्हे उघड  केले होते. त्याला न्यायालयाने कारागृहात डांबले होते. कारागृहातून सुटल्यावर त्याने पुण्यात सुमारे दीड वर्ष रिअल इस्टेट एजन्ट म्हणून कामही केले होते. तेव्हापासून तो फरार होता आणि पुन्हा चोऱ्यांचे सत्र त्याने सुरु केले. प्रशांत हा बॅण्डेड कपडे घालून तो हाय सोसायटी मध्ये किरायाचे वाहन करून रेकी करुन मोठाले बंगले टार्गेट करुन चोरी करायचा. महागडे कपडे घातल्याने कुणी आपल्याला ओळखणार नाही, या अविर्भावात तो होता. मात्र, पोलिसांनी त्याचा डाव हाणून पाडत त्यास बेड्या ठोकल्या.

युट्युबवर घेतले धडे

चोरी करताना सोसायटीतील बंगल्याच्या बाजूला असलेल्या बॅटरीचा करंट कसा ओलांडायचा तसेच घरफोडी कशी करायची, याबाबत प्रशांतने यू-ट्यूबवर प्रशिक्षण घेत होता. त्याला ग्लास, लॉकर, दरवाजे कसे तोडायचे हे देखील चांगलेच अवगत होते. घरफोड्या करण्यासाठी तो चोरीच्या दुचाकीचा वापर करायचा. आधी शहरातून एखादी दुचाकी चोरायचा. दुसऱ्या शहरात गेल्यानंतर तेथे दुचाकी सोडून पुन्हा दुसरी दुचाकी चोरायचा, नंबरप्लेट काढून शहरात फिरायचा. उच्चभ्रू वस्तीतील बंगल्यांना टार्गेट करून चोरी करायचा, अशा त्याने विविध शहरातून १३ दुचाकी चोरल्या असल्याची कबूली त्याने दिली.

चोरी केली कि गोव्यात मौजमस्ती

प्रशांत हा एकटाच चोरी करायचा. पैशे जमा झाले की तो गोव्याला जायचा आणि मौज मस्ती करायचा. चोरट्याला मसाज करण्याचा शौक असल्याचही त्याने पोलिसांना सांगितलंय. सुरवातीला त्याने आपल्या प्रेमिकेची हौस पूर्ण करण्यासाठी चोरी केलीय. मागील वर्षांपासून प्रेमिकेसोबत संबंध नसल्याने तो गोव्याला जाऊन चोरीच्या पैश्यातून मौज मस्ती करत आराम करत होता आणि पैसे संपले की पुन्हा चोऱ्यांचे नियोजन करत होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow