रास्त दुकानदारावर कारवाई अन् परवाना रद्द न करण्यासाठी तहसीलदार आणि कोतवालानं चाळीस हजार मागितले ; वीस हजार स्वीकारताना रंगेहाथ सापडले ; कुठे घडला हा प्रकार

Jun 1, 2024 - 07:56
Jun 1, 2024 - 07:57
 0  738
रास्त दुकानदारावर कारवाई अन् परवाना रद्द न करण्यासाठी तहसीलदार आणि कोतवालानं चाळीस हजार मागितले ; वीस हजार स्वीकारताना रंगेहाथ सापडले ; कुठे घडला हा प्रकार

आय मिरर

रास्त दुकानदारावर कारवाई व परवाना ही रद्द न करण्यासाठी केज तहसील कार्यालयातील तहसीलदार व कोतवाल २० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. अभिजीत लक्ष्मण जगताप व मच्छिंद्र मारोती माने, अशी लाच मागणाऱ्यांची नावे असून दोघे केज तहसील कार्यालयात अनुक्रमे तहसीलदार व कोतवाल पदी आहेत. तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची मागणी करून २० हजार स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले.

या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांचे रास्तभाव धान्य दुकान असून, त्यांचे रास्त भाव धान्य दुकानामध्ये शासनाकडून मिळालेला धान्यसाठा व तक्रारदार यांनी ग्राहकांना वाटप केलेले धान्य यामध्ये तफावत असल्याचे सांगून तक्रारदार यांचेवर कारवाई न करण्याकरीता तसेच त्यांचा रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना रद्द न करण्याकरीता तहसिलदार अभिजीत जगताप याने कोतवाल मच्छिंद्र माने याचे मार्फतीने तक्रारदार यांचेकडे पंच साक्षीदार यांच्यासमक्ष ४० हजार रुपये लाच मागणी करुन प्रोत्साहन दिले. तसेच माने याने तडजोडी अंती २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करुन पंच साक्षीदारा समक्ष तक्रारदार यांचेकडुन लाच रक्कम स्वीकारले. मच्छिंद्र माने यास ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सिद्धराम म्हेत्रे व त्यांच्या सापळा पथकातील पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे नागेश शेरकर, चालक दत्तात्रय करडे यांनी केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow