Crime : आधी गळा घोटला मग डोकं आपटलं ! 80 वर्षाच्या आजी सोबत नातवानं भयानक केलं ; कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल
![Crime : आधी गळा घोटला मग डोकं आपटलं ! 80 वर्षाच्या आजी सोबत नातवानं भयानक केलं ; कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल](https://imirror.digital/uploads/images/202403/image_870x_65f67f19aa255.jpg)
आय मिरर
कर्ज फेडण्यासाठी नातवाने थेट आजीचा गळा घोटाळ्याचा प्रकार कोल्हापूर मध्ये घडला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.कोल्हापुरातील मुरगुड येथे घडलेल्या या घटनेतील एका आरोपीला आजीचा खून केल्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गणेश चौगले रा. विक्रमनगर, इचलकरंजी अस आरोपीचं नाव आहे.पोलिसांनी गणेशचे मित्र नरेश उर्फ नरेंद्र दगडु करपे वय २५, रा.म्हसोबा गल्ली, इचलकरंजी यास देखील ताब्यात घेतले असून या प्रकरणात एका विधी संघर्षग्रस्त बालकचा ही समावेश आहे.
संबंधित मृत महिलेचा नातू सुशांत पुंडलिक जाधव वय ३१, रा. सेनापती कापशी, ता. कागल, जि. कोल्हापूर यांनी या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दिलेल्या तक्रारीनुसार,कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील भोई गल्लीत राहणा-या सगुना तुकाराम जाधव वय ८० वर्षे या वृध्द महिलेचा नातू गणेश चौगले याचा पैशासाठी आजीचा मागे तगादा होता.गणेशला काढलेले कर्ज फेडण्यासाठी पैशाची गरज होती.त्याने
विक्रमनगर येथील राहते घर विकलेले होते. तरीदेखील त्याचे कर्ज संपलेले नव्हते. म्हणून आजी सगुना जाधव यांच्या खात्यातील बँकेमधील दोन लाख रुपयांपैकी एक लाख रुपये त्याला हवे होते.आजीने पैसे देण्यास नकार दिल्याने गणेश याने आपल्या अन्य दोन मित्रांच्या मदतीने आजीचा गळा आवळून खुन केला.यानंतर आरोपींनी आजीच्या हातातील सोन्याच्या दोन पाटल्या व कानातील सोन्याची कर्णफुले काढून घेतली.
कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सपोनि चेतन मस्टगे व पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार विजय इंगळे, रोहित मर्दाने व प्रदिप पाटील यांच्या पथकांने ही कारवाई केली.
What's Your Reaction?
![like](https://imirror.digital/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://imirror.digital/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://imirror.digital/assets/img/reactions/love.png)
![funny](https://imirror.digital/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://imirror.digital/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://imirror.digital/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://imirror.digital/assets/img/reactions/wow.png)