पुण्याच्या इंदापुरात प्रवीण गायकवाडांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, झालेल्या घटनेचा बहुजन समाजाने नोंदवला निषेध...

Jul 14, 2025 - 15:46
 0  348
पुण्याच्या इंदापुरात प्रवीण गायकवाडांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, झालेल्या घटनेचा बहुजन समाजाने नोंदवला निषेध...

आय मिरर 

ज्या इंदापूर मधील शिवधर्म फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट मध्ये काळ फासलं त्याच इंदापूरमध्ये आज बहुजन समाजाने एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला आहे याशिवाय प्रवीण गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी ही केली आहे.

प्रवीण दादा गायकवाड आप आगे बढो हम तुम्हारे साथ है ! प्रवीण दादा अंगार है बाकी सब भंगार है असा नारा यावेळी बहुजन समाजाच्या वतीने देण्यात आलाय.

दौंड मध्ये ही विविध संघटनांकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड आणि बहुजन समाजातील संघटनांनी केली आहे.

यावेळी दीपक काटे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून सरकारने संबंधित आरोपींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेड या संघटनेने केली आहे.

नेमकं काय घडलं ? 

प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग पदाधिकाऱ्यांच्या मनात होता.

यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते. दरम्यान, प्रवीण गायकवाड यांचा रविवारी 13 जुलै रोजी अक्कलकोटमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र, या सत्कार समारंभाच्या ठिकाणीच त्यांना काळं फासण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला. दरम्यान, इंदापूरच्या शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केल्याने पोलिसांनी शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow