फक्त 17 मिनिट अन् 26 लाख गायब,प्लॅन पाहून पोलिसही शाॅक
आय मिरर
चोरीचं एक अतिशय अजब प्रकरण समोर आलं आहे. यात चोरट्यांनी अवघ्या 17 मिनिटांत 26 लाख रूपये लुटले. त्यांची चोरीची पद्धत पाहून पोलिसही थक्क झाले. राजस्थानच्या अलवरला लागून असलेल्या खैरथलच्या औद्योगिक परिसरातून ही घटना समोर आली आहे.
यात पंजाब नॅशनल बँकेचं एटीएम मशीन चोरट्यांनी उखडून टाकलं. चोरट्यांनी कारने एटीएम फोडलं. मग त्यांनी ते कारमध्ये टाकलं आणि घेऊन गेले.
एटीएम मशिनमध्ये सुमारे 26 लाख रुपयांची रोकड असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र, अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खैरथल येथील इस्माइलपूर रोडवरील इंडस कंपनीजवळ असलेल्या पीएनबी एटीएममध्ये ही घटना घडली.
एटीएमजवळ राजकुमार टी स्टँड आहे. रविवारी पहाटे 4 वाजता राजकुमार चहाची टपरी उघडण्यासाठी तिथे पोहोचला असता त्याला एटीएमची काच तुटलेली दिसली. एटीएम मशीनचं शेल बाजूला पडलं होतं. तेथील परिस्थिती पाहून त्यांनी कंपनीचे गार्ड दीपक आणि शेजारी असलेल्या इतरांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच किशनगढबसाचे डीएसपी राजेंद्र सिंह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि आजूबाजूचे लोक आणि बँक व्यवस्थापनाकडून संपूर्ण माहिती घेतली. पीएनबीच्या शाखा व्यवस्थापकाने सांगितलं की, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने शनिवारीच एटीएम मशीनमध्ये 28.5 लाख रुपयांची रोकड जमा झाली. यातील सुमारे अडीच लाख रुपयांची रोकड काढण्यात आली आहे. एटीएम मशिनमध्ये सुमारे 26 लाख रुपयांची रोकड असल्याचं सांगण्यात येत आहे.
रात्री 2:17 वाजता एक कार तिथे येऊन थांबल्याचं तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. त्यात आलेल्या हल्लेखोरांनी अवघ्या 17 मिनिटांत हा गुन्हा केला. ते एटीएम मशिन उखडून 2.34 वाजता परत गेले. तातारपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी अंकेश चौधरी यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले. पीएनबी बँकेचे हे एटीएम ज्या ठिकाणी बसवले आहे ते खैरथळ-तिजारा राखीव पोलीस लाईनसमोर आहे.
What's Your Reaction?