डिकसळ जुन्या पुलाच्या कामास त्वरित मंजुरी द्या, नवीन पुलाचे काम युद्ध पातळी करा - देविदास साळुंखे

आय मिरर(विजयकुमार गायकवाड)
डिकसळ ( ता.इंदापुर) ते कोंढार चिंचोली ( ता.करमाळा) या जुन्या पुलाच्या दुरुस्तीच्या कामास त्वरित मंजूरी द्यावी व नवीन पुलाच्या पाईलिंगचे (कॉलम )चे काम त्वरित युद्धपातळीवर चालू करावे अशी मागणी कोंढार चिंचोलीचे मा. सरपंच व आर टी आय कार्यकर्ते देविदास साळुंके यांनी केली आहे.या संदर्भातील निवेदन सार्वजनिक बांधकामास दिले आहे.चीफ इंजिनिअर खलाटे व पुलाच्या कामाचे ठेकेदार राहुल पटेल यांच्याशी साळुंखे यांनी चर्चा केली असून पुलाचे जुन्या /व नव्या पुलाच्या कामाचा आढावा घेतला आहे.
चर्चेवेळी नवीन पुलाच्या पाईलींगच्या कामाची चीफ इंजिनिअर चव्हाण यांची शिफारस घेऊन पुणे येथील पुल डिझाईन यांची मंजुरी घेऊन सदर पाईललिंग मंजुरीसाठी नवी मुंबई येथील चीफ इंजिनिअर रामगुडे कोकण भवन यांचे कार्यालयाकडे गेले असून सदर पुलाचे पाईललिंग च्या कामास 30 जानेवारी 2024 या 7 दिवसात मंजुरी मिळून पुलाचे कॉलम चालू करणेचे काम फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात चालू होत असल्याचे साळुंके यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?






