फिनोलेक्स पाईप्स आणि मुकुल माधव फाउंडेशन च्या मदतीने मूकबधिर शाळेतील 85 विद्यार्थ्यांना रजई वाटप
आय मिरर
फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड मुकुल माधव फाउंडेशन पुणे यांचे डीलर महाराष्ट्र एजन्सी इंदापूर यांच्या संयुक्तमाने इंदापूर येथील मूकबधिर शाळेतील 85 विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून रजई तथा रग वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीचे सेल्स ऑफिसर निलेश घुले, हृदयरोग तज्ञ डॉ. एस टी शहा व प्रमोद भंडारी शाळेचे मुख्याध्यापक अमोल उन्हाळे उपस्थित होते.
यावेळी नंदकुमार गुजर म्हणाले की, फिनोलेक्स इंडस्ट्रीज ही देशातील एक नंबर रिजिड पी व्ही सी पाईप कंपनी आहे त्यांचे स्वतःचे फाउंडेशन हे सामाजिक कार्य अत्यंत चांगल्या प्रकारे करते गरजू लोकांना मदत करणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे तसेच ऑपरेशन मोफत करून देणे यात सक्रिय सहभाग असतो. कंपनीचे चेअरमन प्रकाश छाब्रिया व मुकुल माधव फाउंडेशनचे चेअरमन सौ रितू या आहेत.सूत्रसंचालक तुकाराम डूकले यांनी केले.
What's Your Reaction?