Dound Leopard : अकरा महिन्याच्या चिमुकल्याला गिळणारा बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात झाला कैद ? सोशल माध्यमात व्हायरल होतोय व्हिडिओ

आय मिरर
पुण्याच्या दौंड तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दहिटणे गावात बापूजी बुवा वस्तीवर अकरा महिन्याच्या अनवित भिसे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यानंतर या बिबट्याचा वन खात्याकडून शोध घेतला जातोय.दरम्यान काल रात्रीच्या सुमारास बापूजी बुवा वस्ती येथे बिबट्याचा वावर स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला असून, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.हा मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेला बिबट्या चा व्हिडिओ दहिटणे गावातील बापूजी बुवा वस्ती परिसरातील असल्याचे बोलले जातेय.
दौंड तालुक्यातील दहिटणे येथून एका 11 महिन्याच्या मुलाला बिबट्या उचलून घेऊन गेल्याची गंभीर घटना बुधवारी 30 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. तेव्हापासून या मुलाचा वनविभाग स्थानिक नागरिक आणि पोलीस खात्याच्या माध्यमातून शोध सुरू होता. अखेर या मुलाचा गुरुवारी 01 मे रोजी दुपारी बारा ते सव्वा बाराच्या सुमारास शोध लागला.
केवळ 11 महिने वय असणारा अनवित धुळा भिसे हा चिमुकला मृता वस्तीत आढळला.एका उसाच्या शेतामध्ये या मुलाच्या शरीराचा काही भाग यासोबतच रक्ताने माखलेले कपडे पायातील पैंजण अशा काही वस्तू वन विभागाच्या आणि पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांना व स्थानिक नागरिकांना मिळून आल्या.ते पाहून भिसे कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला तर उपस्थितांना ही अश्रू अनावर झाले.
अनवित भिसे याचा सर्च ऑपरेशन थांबलं असलं तरी बिबट्याच सर्च ऑपरेशन मात्र वन विभागाकडून सुरू आहे. याच दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. ज्यात रात्रीच्या अंधारात बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याचे दिसून येत आहे. आणि हा व्हिडिओ दौंड तालुक्यातील दहिटणे गावातील बापूजी बुवा वस्ती परिसरातील असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे वन विभागाने शर्तीचे प्रयत्न करून या बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी ही आता केली जात आहे.
What's Your Reaction?






