पुरंदर विमानतळाच्या ड्रोन सर्वेसाठी स्थानिकांचा विरोध,शेतकऱ्यांनी ड्रोन सर्वे तात्पुरता पाडला बंद

आय मिरर
पुण्यातील पुरंदर तालुक्यात होत असलेल्या विमानतळाला स्थानिक लोकांचा विरोध कायम असून आज सुरू झालेला ड्रोन सर्वे स्थानिक शेतकऱ्यांनी बंद पडलाय. हा ड्रोन सर्वे करण्यासाठी सरकारच्यावतीने मोठा फौज फाटा मागविण्यात आला होता. मात्र तरी देखील स्थानिक लोकांनी प्रचंड विरोध करत हा ड्रोन सर्वे बंद पडला आहे. पुरंदर तालुक्यातील ऐखतपूर,मुंजवडी या गावातून हा सर्वे सुरू करण्यात येत होता.
प्रांताधिकारी वर्षा लांडगे या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्या नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत. एकंदरीत परिस्थिती पाहता आजचा हा सर्वे तूर्तास तरी रद्द होऊ शकतो अशी परिस्थिती आहे.
पोलीस आणि स्थानिक शेतकरी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला असून स्थानिक लोक ड्रोन सर्वेला तीव्र विरोध करत आहेत.. स्थानिक लोकांचा पुरंदर विमानतळासाठी तीव्र विरोध असताना देखील सरकार मात्र या विमानतळाच्या निर्मिती वरती ठाम आहे. मागील महिनाभरात स्थानिक लोकांनी दोन आंदोलने केली होती. मात्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद या लोकांना मिळाला नव्हता.. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी, एखतपुर, मुंजवडी, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या गावांमध्ये विमानतळ प्रस्तावित आहे. या विमानतळासाठी 2852 हेक्टर म्हणजे 7130 एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. त्यामुळे या भागातील सातही गावातील सुमारे साडे आठशे कुटुंब म्हणजेच 4 हजार लोकांना विस्थापित व्हावे लागणार आहे.सात गावातील लोकांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे मागील आठ वर्षापासून या गावातील लोक विमानतळाला विरोध करीत आहेत.मागील आठवड्यात या लोकांनी पुण्यातील जिल्हाधिकारायलया पर्यंत मोर्चा काढला होता.
What's Your Reaction?






